

नागपूर : कायद्याची पदवी ही केवळ कायदेशीर प्रकरणे सोडविण्यासाठी नसून या पदवीचा उपयोग सामाजिक समस्या सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केले. शनिवारी राष्ट्रीय महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांन्त समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही.एस. सिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि प्रो-चान्सलर आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती नितीन सांभरे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती अनिल किलोर, जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश विवेक गव्हाणे, कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार उपस्थित होते.