मैत्री (Friendship) जपावी तर अशी अशा आशयाचे सोशल मीडियावरून (Social Media) त्या दोघा गुणवंतांचे अभिनंदन करीत आहेत.
देगलूर : रक्ताच्या नात्यापेक्षा कधी-कधी मैत्रीचे नाते श्रेष्ठ ठरते. एकमेकांच्या सुख-दुःखात वाटेकरी होत अनेक जण आपली मैत्री जीवनभर जपत असतात. तालुक्यातल्या तमलूर येथील दोन बालमित्रातील (Child Friend) पहिलीपासून सुरू झालेला शिक्षणातील प्रवास अखेर दोन मित्रांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक या पदावरील निवडीपर्यंत येऊन थांबला. त्यामुळे या मैत्रीच्या यशाचे तंमलूरवासीय कौतुक करीत आहेत.