
Childbirth Incentive Scheme: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अलीकडेच जाहीर केलं की, ज्या कुटुंबांमध्ये अधिक मुले असतील, त्यांना सरकारकडून प्रोत्साहनरूपात आर्थिक मदत देण्याचा विचार सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे की, दक्षिण भारतात जन्मदर झपाट्याने घटत आहे आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.