मुले अभ्यास करत नाहीत, मग करा हे..

अभ्यास न करण्यामागची काही सामान्य कारणे
Children not studying reasons
Children not studying reasons

नागपूर : चिंटू अभ्यासात हुशार आहे. पण शाळा सुरू झाल्या तेव्हापासून त्याचे मन अभ्यासात रमत नाही. मोबाईल किंवा खेळण्यातच तो वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. हातात पुस्तक घेऊन बसतो. मात्र, पाच-दहा मिनिटांनी त्याचे भिरभिरणे सुरु होते. आज-काल त्याला लवकर पाठांतरही होत नाही. अनेकदा त्याचे बाबा त्याला शिक्षा सुद्धा देतात, पण गडी काही ऐकेना. तो अभ्यासात मागे पडणार, असा धाक निलिमाकाकूंना आहे. चिंटूच्या अशा सवयीबद्दल करावे तरी काय? आज हेच आपण जाणून घेऊयात.

पालकांनी हे करावे

  • मुलांना शिस्त लावावी

  • अभ्यासाचा टाईम टेबल बनवा

  • अवांतर वाचनाची गो़डी लावावी

  • मुलांच्या यशाचे नियमित कौतुक करावे

  • मुलांच्या आवडीच्या विषयाकडे लक्ष द्या

  • ध्येय सेट करण्यासाठी प्रोत्साहित करा

  • घरातील वातारवण नेहमी प्रसन्न ठेवा

अभ्यास न करण्यामागची काही सामान्य कारणे

  • विषय समजण्यास वेळ लागणे

  • शाळेत शिकवलेले न समजणे

  • मंद शिकण्याची प्रवृत्ती

  • नैराश्य आणि इतर मानसिक समस्या

  • मित्रांचा दबाव किंवा वाईट संगत

  • अभ्यासाच्या प्रेरणेचा अभाव

  • पालकांचे मुलांकडे लक्ष न देणे

  • चांगला अभ्यास करण्याचा दबाव

  • पालकांकडून मोठ्या अपेक्षा

  • शिक्षकाची किंवा विषयाची भीती

मानसिक समस्या

  • हाइपरएक्टिविटी डिसऑर्डर

  • अभ्यासाबाबत एंग्जायटी

  • डिप्रेशनमुळे मन लागत नाही

  • स्क्रिनिंग एडिक्शन असु शकते

  • लर्निंग पॉवर कमी असू शकतो

या गोष्टींवर ठेवा लक्ष

  • मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारींकडे लक्ष द्या

  • शाळेतून आल्यावर मुलांना विश्रांती घेऊ द्या

  • नियमित शिक्षकांच्या संपर्कात राहा

  • मुलांशी मोकळेपणाने बोला

  • अभ्यास करण्यासाठी मुलांना प्रेरित करा

  • नियमित मुलांच्या संपर्कात राहा

अभ्यासाचे वातावरण तयार करा

अभ्यासासाठी घरातील वातावरण अनुकूल ठेवा. अभ्यासाच्या ठराविक वेळेत मुलांना डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. अभ्यासाचे साहित्य पटकण सापडेल अशा जागी ठेवा.

अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य द्या

मुलांना त्यांच्या आवडीनुसार अभ्यास करु द्यावा. आवडते विषय संपल्यावर कठीण विषयाचा अभ्यास करण्यास सांगावे. अभ्यास करताना अधून मधून ब्रेक घेऊ द्यावा.

कंपेअर करू नका

प्रत्येक मुलांची लर्निंग ॲबिलिटी निराळी असते. त्यामुळे दुसऱ्या मुलांशी तुलना करू नका. तुलना करताना त्यांच्यावर नाहक अभ्यासाचा दबाव टाकू नका.

अभ्यासाचे बर्डन देऊ नका

मुलांना स्वतंत्रपणे अभ्यास करू द्यावे. अभ्यास करताना त्याच्यावर दबाव येईल, अशी कोणतीच कृती करू नये. अभ्यासाला ‘फन फॅक्टर’ ची जोड द्यावी.

मुलांचे अभ्यासात मन न रमण्याचे मुख्य कारण त्यांचा कॉन्फिडन्स लेव्हल कमी असणे. घरातील वातावरण कारणीभूत असते. वातावरण नेहमी उत्साही ठेवावे. पालकांनी मुलांसमोर भांडू नये. मुलाची इतरांबरोबर तुलना करु नये यामुळे मुलं डिप्रेशनचे शिकार होतात.

- डॉ. प्रवीण नवखरे, मनोचिकित्सक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com