

Civil Engineering
sakal
प्रा. प्रतीक्षा वाघ-अभियांत्रिकी संशोधक
सिव्हिल इंजिनिअरिंग अत्यंत गतिमान, प्रतिष्ठित आणि भविष्यकालीन संधींनी भरलेले करिअर क्षेत्र असून आधुनिक जगाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावते. रस्ते, पूल, इमारती, धरणे, विमानतळ आणि रेल्वे व्यवस्था या सर्व पायाभूत सुविधांमागे सिव्हिल इंजिनिअरचे ज्ञान, कल्पकता आणि मेहनत असते. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पायाभूत सुविधांचे नियोजन, डिझाइन, बांधकाम आणि देखभाल यांचा समावेश होतो, जे दैनंदिन जीवन आणि आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक आहे. प्रत्यक्ष कामात रस, सर्जनशील विचारसरणी आणि समस्या सोडविण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग हे समाधानकारक आणि अर्थपूर्ण करिअर ठरते.