
डॉ. राजेश ओहोळ - करिअरतज्ज्ञ
अचानक बिघाड आणि अपघात टाळण्यासाठी स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग महत्त्वाचे आहे. कोणत्याही बांधकामाला सुरवात करण्यापूर्वी, बांधकाम साइट, जवळच्या मालमत्तेचे मॉनिटरिंग करणे आवश्यक आहे. भू-तंत्रज्ञान उपकरणे आणि मॉनिटरिंग संरचनेच्या कामगिरीबद्दल परिमाणात्मक डेटा पुरवतात, जेणेकरून त्याच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यात आणि सुरवातीच्या टप्प्यात समस्या शोधण्यात मदत होईल. डिझाइन त्रुटी, भूगर्भीय अस्थिरता, खराब देखभाल, बांधकाम साहित्याचा बिघाड इत्यादी अनेक कारणांमुळे स्ट्रक्चर्स अपयशी ठरू शकतात. स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग ही सर्व स्ट्रक्चर्सवर लक्ष ठेवण्याची आणि अपघात टाळण्यासाठी लवकर चेतावणी देण्याची प्रक्रिया आहे. शाश्वत विकासासाठी नागरी पायाभूत सुविधांचे स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग महत्त्वपूर्ण आहे.