CLARA schools admission begins for 2021 and 2022
CLARA schools admission begins for 2021 and 2022

मुलांसाठी ऍडमिशन घ्यायचं तर 'क्‍लारा ग्लोबल स्कूल'चा विचार करा; 2021-22 साठी ऍडमिशन सुरू

स्वप्न पहा, विश्‍वास ठेवा, साध्य करा. 

विजेता होण्यासाठी स्पर्धा करा ! 
महान विजेता होण्यासाठी विजेत्याशी स्पर्धा करा ! 
परंतु, सर्वोत्कृष्ट विजेता होण्यासाठी स्वत:शी स्पर्धा करा ! 

इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेतसुद्धा वार्षिक पारितोषिक दिवस असतो. आम्ही या समारंभात "स्वतःबरोबर स्पर्धा' असे विशेष पुरस्कार ठेवतो. जे विद्यार्थी मिड टर्म (सामाईक परीक्षा) मध्ये चांगले गुण मिळवत नाहीत, परंतु अंतिम परीक्षेत कठोर परिश्रम करून चांगले गुण मिळवतात, त्यांच्या दोन्ही परीक्षेतील गुणांची तुलना केली जाते. सर्वांत जास्त फरक असलेल्या मुलाने खरोखरच कठोर परिश्रम करून शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केलेली असते. 

आमच्या शाळेत "स्वतःसह स्पर्धा' हे मनोविमान शिकवले जाते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या कामात गुंतलेला असतो. विद्यार्थी स्वत:हून स्वत:च शिकण्याची कौशल्ये आत्मसात करतो. 

क्‍लारा ग्लोबल स्कूलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यास प्रोत्साहित केले जाते. वार्षिक दिन, क्रीडा दिवस, इंग्रजी आठवडा, हिंदी आठवडा, वक्तृत्व, प्रदर्शन, वादविवाद, नृत्य, संगीत, कला इत्यादी कार्यक्रमांमध्ये मुले स्वत:ला सुधारतात, स्वतःची क्षमता समजतात. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतात. 

क्‍लारा ग्लोबल स्कूल नेहमी स्वत:शी स्पर्धा करणाऱ्यांवर विश्वास ठेवते. आम्ही मुलांना स्वतःशी स्पर्धा करायला शिकवतो; कारण प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी तरी कोणापेक्षा तरी काहीतरी चांगलं करू शकते. पण नेहमीच असं होत नाही. आज तंत्रज्ञान प्रत्येक घरापर्यंत पोहचत आहे. जास्तीत जास्त लोक सोशल मीडियावर अडकलेले दिसतात. आम्ही ऑनलाइनमध्ये लोकांची फक्त चांगली बाजू पाहण्याचा विचार करतो. ऑनलाइनमध्ये क्वचितच कोणीतरी आपल्या अपयशाबद्दल पोस्ट करते. 

पालक सतत स्पर्धात्मक परीक्षेत टॉपर्स कोण आहे, हे पाहतात. ऑलिम्पियाड परीक्षेत कोण विजेता आहे, हे पाहतात. पालकांनी स्वत:ला हे प्रश्न विचारून पाहावे, "आपल्या मुलांनी ही शर्यत चालू ठेवावी का? इतरांच्या पावलावर चालत राहावे अशी आमची इच्छा आहे का?' क्‍लारा ग्लोबल स्कूलमध्ये विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांऐवजी स्वतःहून कोणतेही काम पूर्ण करायला शिकतात. आम्ही विद्यार्थ्यांमधील सामर्थ्य आणि कमकुवतपणा ओळखून चांगला परिणाम घडवून आणतो. 

आपल्या योद्‌ध्यांशिवाय हे शक्‍य आहे का? आपले योद्धे म्हणजे आपले शिक्षक. आपले शिक्षक सतत अद्यतनित (नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास) केले जातात. नवीन तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि अध्यापनाच्या कार्यपद्धतीत बदल, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपले शिक्षक करतात. विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी योग्य दिशेची गरज असते, ती दिशा आमचे शिक्षक दाखवतात. अध्यापनात योग्य मार्ग सर्वांत जास्त आवश्‍यक आहे. म्हणूनच आमचे शिक्षक आहेत. 

तुम्ही स्वत:शी स्पर्धा केल्यास : 

* दुसरा कोणी पुढे गेल्यास तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. 
* तुमच्या यशाचे मोजमाप तुम्ही स्वतः करता. 
* तुम्हाला आनंद देणाऱ्या अगणित गोष्टींमध्ये तुम्ही भाग घेता. 
* तुम्हाला कसे वाटते, तुम्ही स्वतःला कसे परिपूर्ण करता तसेच तुम्ही जगण्याची कोणती पद्धत निवडता यावर तुम्ही तुमचे यश ठरवता. 
* तुम्ही तुमच्या क्षमतेवर आणि कामगिरीवर विश्वास ठेवण्यास सुरुवात करता. 
* तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ध्येयावर एकाग्रतेने लक्ष्य केंद्रित करता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com