

Maharashtra SSC Exam 2026
esakal
Maharashtra SSC Exam 2026: राज्यात उद्यापासून (२० फेब्रुवारी २०२६) दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासोबतच थोडीशी धाकधूकही पाहायला मिळत आहे. वर्षभराच्या अभ्यासानंतर आजपासून सुरू होणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने आणि योग्य नियोजनासह परीक्षेला सामोरे जाणे आवश्यक आहे.