पुणे - राज्यात सद्यःस्थितीत काही जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी खुल्या (ओपन टू ऑल) या विशेष फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २२) मुदत वाढ देण्यात आली आहे.