
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात शाळांसाठी ‘पीएमश्री’च्या धर्तीवर आता ‘सीएमश्री’ योजना राबविण्यात येणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी पत्र जारी केले असून ३१ जानेवारीपर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांनी सीएमश्री शाळांसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.