स्पर्धा परीक्षांची तयारी

डॉ. श्रीराम गीत
Friday, 13 December 2019

मला सरकारी नोकरीच हवी असे मोठी शहरे सोडून अनेक विद्यार्थ्यांना वाटत असते. त्यांच्या मनात तसे ठसलेले असते असेही म्हणा ना. काहींना बॅंकांचे आकर्षण असते. क्वचित सैन्यात अधिकारी बनायचे स्वप्न पाहणारे विद्यार्थीच काय पण विद्यार्थिनी, पण साऱ्याच महाराष्ट्रात सापडतात. आता गमतीची गोष्ट म्हणजे बिहार, केरळ, तमिळनाडू या तीन राज्यांमध्ये सरकारी अधिकारी किंवा बॅंकेत जायचे स्वप्न पाहणारे त्याची तयारी अगदी अकरावी, बारावीपासून सुरुवात करतात.

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
मला सरकारी नोकरीच हवी असे मोठी शहरे सोडून अनेक विद्यार्थ्यांना वाटत असते. त्यांच्या मनात तसे ठसलेले असते असेही म्हणा ना. काहींना बॅंकांचे आकर्षण असते. क्वचित सैन्यात अधिकारी बनायचे स्वप्न पाहणारे विद्यार्थीच काय पण विद्यार्थिनी, पण साऱ्याच महाराष्ट्रात सापडतात. आता गमतीची गोष्ट म्हणजे बिहार, केरळ, तमिळनाडू या तीन राज्यांमध्ये सरकारी अधिकारी किंवा बॅंकेत जायचे स्वप्न पाहणारे त्याची तयारी अगदी अकरावी, बारावीपासून सुरुवात करतात. 

महाराष्ट्रात मात्र पदवीच्या शेवटच्या वर्षात अनेकांना अचानक साक्षात्कार होतो की, आता सरकारी नोकरीसाठी किंवा बॅंकेसाठी परीक्षा देऊन टाकुयात. त्यात काय परीक्षा द्यायची अन्‌ निवड झाली की नोकरी पक्की. त्यासाठी काय करायचे तर फक्त क्‍लास लावायचा लाखभर रुपये खर्चून. खरेतर सरकारी नोकरी/बॅंकेत नोकरी/सैन्याधिकारी या साऱ्यासाठी एकच किमान गरज आहे. कोणतीही पदवी चांगल्या मार्कांची. मग ती घेत असतानाच फक्त या परीक्षांचे स्वरूप समजावून घेणारे बिहारी, केरळी, तमिळी या साऱ्या ठिकाणी बाजी मारून जातात. आज यूपीएससीच्या निकालात गेल्या पन्नास वर्षांत या तीन राज्यांना कोणीही मागे टाकू शकत नाही. कारण एकच स्वप्नांचे त्यांनी शब्दांकन करत त्या दिशेने सुरुवात करून चार-पाच वर्षे झालेली असतात, तेव्हा आम्ही क्‍लास लावण्याचा शोध सुरू करतो. निदान या साऱ्या परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाची गरज माहिती करून घेणे यासाठीसुद्धा मला काय करायचे याची नेमकी निश्‍चिती कागदावर उतरवणे गरजेचे ठरते. 

अशीच गोष्ट एमबीए या पदवीची. यावर संपूर्ण महिनाभर याआधीच लिहिले आहे, मात्र एमबीएच्या प्रवेश परीक्षेची सर्वसाधारण माहिती पदवीच्या तीन वर्षांत घेणारा पदवीधर खरोखर शोधावा लागतो. खरेतर कोणत्याही पदवीधराला ही परीक्षा देता येते. मग त्याची पूर्वतयारी किंवा प्राथमिक माहिती पदवीधर होईतोवर करायची नाही याचा सोपा अर्थ एमबीएचे स्वप्नरंजन करत राहणे. दरवर्षी नित्यनियमाने जून महिन्यात पालकांकडून तीस चाळीस हजार घेऊन कॅट परीक्षेचा म्हणजे एमबीए प्रवेश परीक्षेसाठीचा क्‍लास लावणारे हजारो पदवीधर कोणाच्या खिशाची भर करत असतात हे वेगळे सांगायची गरज नाही. म्हणूनच कोणत्याही पदवीधराने त्याच्या स्वप्नांचे शब्दांकन शाळा सोडण्यापासून कधीही केले तर त्याचा उपयोग त्यालाच होतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: competition exam preparation