

Computer Typing Exam Under CCTV
sakal
CCTV and Zoom Monitoring in Typing Exams: दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा, 'टीईटी'च्या धर्तीवर आता संगणक टंकलेखन परीक्षा केंद्रांवरही सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही नाहीत, तेथील पर्यवेक्षकांचे झूम अॅपद्वारे मोबाईल कॅमेरे सुरू ठेवले जाणार आहेत. ५ ते १० जानेवारीपर्यंत २०३ केंद्रांवर इंग्रजी संगणक टंकलेखन परीक्षा पार पडणार आहे.