कोरोनाचा शिक्षणावर परिणाम 

डॉ. स्वाती मुजुमदार
Thursday, 16 April 2020

‘कोविड-१९’चा उच्च शिक्षणावर दूरगामी परिणाम होणार आहे. इंजिनिअरिंग व आर्किटेक्चरसाठी प्रवेश परीक्षेस उशीर होणार आहे.तसेच,नोकरी गमावणे,वेतन कपात,टाळेबंदी,सेक्टर बंद होणे याचा देय क्षमतेवर परिणाम होईल.

‘कोविड-१९’चा उच्च शिक्षणावर दूरगामी परिणाम होणार आहे. इंजिनिअरिंग व आर्किटेक्चरसाठी प्रवेश परीक्षेस उशीर होणार आहे. प्रवेश परीक्षा न झाल्यास किंवा त्यास विलंब झाल्यास विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि या संदर्भात शासकीय निर्णयांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरी गमावणे, वेतन कपात, टाळेबंदी, सेक्टर बंद होणे याचा देय क्षमतेवर परिणाम होईल. आर्थिक क्षमता कमी झाल्यामुळे शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते.

विद्यार्थी आणि पालक कमी शुल्क अभ्यासक्रम, अल्प मुदतीचा अभ्यासक्रम आणि ऑनलाईन शिक्षण यांकडे गतिमान री-स्किलिंग पर्याय म्हणून अधिक लक्ष देऊ शकतात. शहराबाहेरील विद्यार्थ्यांना असलेल्या कोरोनाच्या धोक्यामुळे आणि न परवडणारे विकल्प असल्याने हॉस्टेलमधील प्रवेश कमी होऊ शकतात. पालक त्यांच्या मुलांना घरी राहून स्थानिक पातळीवर शिक्षण देण्यास प्राधान्य देतील. प्लेसमेंटमध्ये मोठी पोकळी जाणवेल, परंतु विनामूल्य इंटर्नशिप वाढू शकेल. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१) सकारात्मक बाजू पाहिल्यास मास्टर्ससाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते आणि ते स्थानिक पातळीवर पर्याय पाहू शकतात. ज्येष्ठ विद्यार्थी जे कदाचित नोकरी गमावू शकतात, ते शॉर्ट टर्म री-स्किलिंग कोर्सेस शोधू शकतात. 

२) नवनवीन तंत्रज्ञान उदयास येईल आणि अशा प्रकारे या तंत्रज्ञानामधील अभ्यासक्रमांची मागणी लक्षणियरित्या वाढू शकेल. हे अभ्यासक्रम आपल्या संस्थेत चालविण्यासाठी ती सुसज्ज असणे ही भविष्यातील निकड गरज आहे. अशा कौशल्य-आधारित अभ्यासक्रम चालविणारी संस्था आणि विद्यापीठे (उदा ः सिम्बायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीस) भविष्यातील या बदलास सामोरे जाण्यासाठी, तसेच पालक, विद्यार्थी व समाजाची ही मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी दर्शवित आहे. 

डॉ. स्वाती मुजुमदार,  प्रो-चॅन्सलर- सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona impact on education

Tags
टॉपिकस
Topic Tags: