esakal | Courses After Tenth : दहावीनंतर करता येतील "हे' कोर्सेस ! करिअरचे उत्तम पर्याय 

बोलून बातमी शोधा

After 10th}

दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडे करिअर करण्यासाठी आणि निवडण्यासाठी अनेक पर्याय आहेत. परंतु दहावीनंतर आपण कोणता कोर्स निवडता, यावर ते अवलंबून आहे. दहावीनंतर विद्यार्थी विविध प्रकारचे व्यावसायिक कोर्स घेऊ शकतात. त्यासंबंधीची माहिती जाणून घेऊया... 

Courses After Tenth : दहावीनंतर करता येतील "हे' कोर्सेस ! करिअरचे उत्तम पर्याय 
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडे करिअर करण्यासाठी आणि निवडण्यासाठी अनेक पर्याय आहेत. परंतु दहावीनंतर आपण कोणता कोर्स निवडता, यावर ते अवलंबून आहे. दहावीनंतर विद्यार्थी विविध प्रकारचे व्यावसायिक कोर्स घेऊ शकतात. त्यासंबंधीची माहिती जाणून घेऊया... 

आयटीआय कोर्स 
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआय अभ्यासक्रम खूप लोकप्रिय आहेत. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड आहेत, जे विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार निवडू शकतात. त्यातील काही लोकप्रिय कोर्स पुढीलप्रमाणे... 

 • आयटीआय टर्नर 
 • आयटीआय मॅकेनिक 
 • आयटीआय वेल्डर 
 • आयटीआय प्लंबर 
 • आयटीआय इलेक्‍ट्रिशियन 

अभियांत्रिकी पदविका 
दहावीनंतर दुसरा प्रसिद्ध पर्याय म्हणजे विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा करू शकतात. त्यासाठी दहावीत विद्यार्थी गणित व विज्ञान विषय घेऊन पास झालेला असावा. हे डिप्लोमा कोर्स तीन वर्षांचे आहेत. 

 • डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग 
 • डिप्लोमा इन टेक्‍स्टाईल इंजिनिअरिंग 
 • डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग 
 • डिप्लोमा इन इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग 
 • डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग 
 • डिप्लोमा इन आयसी इंजिनिअरिंग 
 • डिप्लोमा इन ईसी इंजिनिअरिंग 
 • डिप्लोमा इन माइनिंग इंजिनिअरिंग 

डिप्लोमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या पदवीला प्रवेश घेता येतो. तसेच दहावीनंतर इतर डिप्लोमा कोर्सेसलाही प्रवेश घेता येऊ शकतो. ते कोणते ते पाहूया... 

 • डिप्लोमा इन फॅशल डिझाईन 
 • डिप्लोमा इन फूड टेक्‍नॉलॉजी 
 • डिप्लोमा इन गारमेंट टेक्‍नॉलॉजी 
 • डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स 
 • डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी 
 • डिप्लोमा इन इन्स्ट्रूमेंटल टेक्‍नॉलॉजी 
 • डिप्लोमा इन इंटेरिअर डिझाईन 
 • डिप्लोमा इन लेदर टेक्‍नॉलॉजी 
 • डिप्लोमा इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स 
 • डिप्लोमा इन मरीन इंजिनिअरिंग