शिक्षण चिंतन : साचेबद्ध शिक्षणपद्धती : फायदे आणि मर्यादा

औद्योगिक क्रांतीतून जन्मलेल्या साचेबद्ध शिक्षणपद्धतीने व्यवस्थापन, मूल्यमापन व संसाधन वापर सुलभ केला असला तरी आजच्या ज्ञानाधिष्ठित, सर्जनशीलतेला महत्त्व देणाऱ्या युगात तिची उपयुक्तता आणि मर्यादा नव्याने तपासण्याची गरज अधोरेखित होते
Critique of standardized education system and industrial era schooling

Critique of standardized education system and industrial era schooling

Sakal

Updated on

डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

आजची शालेय शिक्षणव्यवस्थेच्या स्वरूपाची मुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्रांतीच्या काळात आढळतात. त्या काळात वाढत्या कारखानदारीसाठी शिस्तबद्ध, वेळेचे पालन करणारे, आज्ञाधारक आणि मूलभूत कौशल्ये असलेले कामगार मोठ्या संख्येने आवश्यक होते. या गरजेतून जिथे एका वयाच्या विद्यार्थ्यांना एका वर्गात बसवले जाते, घंटेनुसार वेळेचे काटेकोर नियोजन केले जाते, सर्वांसाठी एकच अभ्यासक्रम व प्रमाणित परीक्षा निश्चित केल्या जातात आणि शिक्षक ज्ञानाचा स्रोत तर विद्यार्थी ज्ञान ग्रहण करणारा असा दृष्टिकोन स्वीकारला जाणारी शिक्षणाची रचना विकसित झाली. औद्योगिक युगातील गरजा पूर्ण करण्यासाठी ती रचना प्रभावी ठरली; परंतु आजच्या ज्ञानाधिष्ठित, वेगाने बदलणाऱ्या आणि सर्जनशीलतेला महत्त्व देणाऱ्या समाजासाठी ही रचना कितपत उपयुक्त आहे, हा विचार करण्याचा विषय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com