
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं CTET 2021 च्या नमुना प्रश्नपत्रिका (Sample Question) नुकतीच प्रसिद्ध केलीय.
दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं CTET 2021 च्या नमुना प्रश्नपत्रिका (Sample Question) नुकतीच प्रसिद्ध केलीय. ज्या उमेदवारांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची 'नमुना प्रश्नपत्रिका' डाउनलोड करायचीय, ते CBSE CTET च्या अधिकृत वेबसाइटवरुन ctet.nic.in डाउनलोड करू शकतात. दरम्यान, पेपर I आणि पेपर II या दोन्हींसाठी नमुना प्रश्नपत्रिका प्रसिद्ध करण्यात आलीय. या नमुना प्रश्नपत्रिकेत निवडक (MCQs) स्वरूपातील प्रश्न असतात. ज्यात योग्य उत्तर पिवळ्या रंगात चिन्हांकित केलं जातं. ज्या व्यक्तीला दोन्ही स्तरांसाठी (इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी) शिक्षक व्हायचंय, त्यांना दोन्ही पेपरसाठी (पेपर I आणि पेपर II) उपस्थित राहावं लागेल.
'अशी' करा नमुना प्रश्नपत्रिका डाउनलोड
1 : प्रथम उमेदवारांनी CBSE CTET च्या अधिकृत वेबसाइटला ctet.nic.in भेट द्यावी.
2 : त्यानंतर वेबसाइटवरील Previous Year Question Paper या लिंकवर क्लिक करावे.
3 : आता प्रश्नपत्रिका तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
4 : ती डाउनलोड करा.
सॅम्पल प्रश्नपत्रिकेसोबतच बोर्डानं सीटीईटी डिसेंबर परीक्षेसाठी सराव केंद्राची यादीही प्रसिद्ध केलीय. ही परीक्षा 16 डिसेंबर ते 13 जानेवारी 2022 या कालावधीत घेतली जाईल. प्रवेशपत्र डिसेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल. तसेच सीटीईटी परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असतील. ही परीक्षा देशभरातील 20 भाषांमध्ये घेतली जाईल. इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गारो, गुजराती, कन्नड, खासी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, मिझो, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलगू, तिबेटी आणि उर्दू अशा 20 भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.