

Cyber Security Career Opportunities and Job Roles
esakal
सुभाष शहाणे
सध्या सर्व काही डिजिटलमय झाले आहे. इंटरनेटचा वापर वाढला आहे. डिजिटल मार्केटिंगचा प्रचार व प्रसार वाढला आहे. मात्र त्याबरोबर सायबर सुरक्षिततेचे आव्हान निर्माण झाले आहे. हॅकर व सायबर गुन्हेगारांकडून कंपन्यांची व ग्राहकांची फसवणूक किंवा नुकसान होऊ नये व कंपनीची सायबर सुरक्षा करण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांची गरज निर्माण झाली आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञ व कन्सल्टंट डाटा सिक्युरिटीचे काम करतात.