
ॲड. जयश्री नांगरे - सायबर सुरक्षा व कायदेतज्ज्ञ
स्मार्ट फोन आणि डिजिटल सुविधांमुळे दैनंदिन जीवनातील कित्येक व्यवहार आपण अगदी सहजपणे ‘ऑनलाइन’ करतो. व्हॉट्सॲप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावरही वावरतो. मात्र, हे सर्व करताना पुरेशी काळजी घेतली नाही, तर आर्थिक फसवणुकीचे, सोशल मीडियाचे अकाऊंट ‘हॅक’ करून आक्षेपार्ह ‘मेसेज’ पाठविल्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडत असतात. त्यामुळे आता ‘सायबर सुरक्षा’ खूप महत्त्वाची ठरते आहे.