esakal | डी. एल. एड प्रथम वर्षाच्या पहिल्या फेरीची यादी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

डी. एल. एड प्रथम वर्षाच्या पहिल्या फेरीची यादी जाहीर

डी. एल. एड प्रथम वर्षाच्या पहिल्या फेरीची यादी जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने डी.एल.एड. प्रथम वर्षाच्या पहिल्या वर्षाच्या नियमित प्रवेश फेरीत सहा हजार ३० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवारपर्यंत (ता. ८) प्रवेश घेता येणार आहे.

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशिक्षण परिषदेमार्फत डी.एल.एड. प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी एकूण ६०४ अध्यापक विद्यालयांनी नोंदणी केली आहे. यात मुदत संपल्यानंतर  दंड आकारून २३ अध्यापक विद्यालयांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली.

प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी १२ हजार ७३७ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. पहिल्या फेरीच्या यादीत समावेश असलेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष संबंधित अध्यापक विद्यालयात प्रवेशासाठी ८ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. प्रवेशाची दुसरी फेरी ११ सप्टेंबर रोजी, तर तिसऱ्या फेरीची यादी १८ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्यस्तरीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव रमाकांत काठमोरे यांनी दिली आहे.

व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासाठी एक हजार ३६९ उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले आहेत. अद्याप नियमित प्रवेश फेरीतून तीन हजार ८४५ पात्र उमेदवारांना प्रवेश जाहीर झालेले नसल्याचेही काठमोरे यांनी सांगितले.

डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक :

तपशील : कालावधी

  • पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे : ८ सप्टेंबरपर्यंत

  • दुसऱ्या फेरीसाठी पर्याय देणे, पर्याय न दिल्यास पूर्वी भरलेले पर्याय ग्राह्य धरले जातील : ९ सप्टेंबर

  • दुसऱ्या प्रवेश फेरीची यादी जाहीर करणे : ११ सप्टेंबर

  • दुसऱ्या प्रवेश फेरीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे : ११ ते १५ सप्टेंबर

loading image
go to top