- शिवांगी मांडके, नृत्यांगना
साहित्य, संगीत, शिल्प, चित्र, नाट्य याप्रमाणेच नृत्य या कलेलाही मोठी परंपरा आणि संस्कृतीचं अधिष्ठान आहे. कथक, भरतनाट्यम असे नृत्याचे विविध प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात.एखादा नृत्यप्रकार शिकून सादरीकरण करत स्वतःचं करिअर घडवणं ही गोष्ट सोपी नसली, तरी कलासाधनेचा आनंद देणारी आहे.