वेध करिअरचा : जाहिरात : एक ‘कलात्मक व्यवसाय’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

advertising

चक्क संध्याकाळी ‘गुडमॉर्निंग, दुधाचा उद्‍घोष करणारी आई, यासारख्या वेगवेगळ्या टॅगलाइनद्वारे भरवसा देणाऱ्या जाहिराती प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात घर करून राहतात.

वेध करिअरचा : जाहिरात : एक ‘कलात्मक व्यवसाय’

चक्क संध्याकाळी ‘गुडमॉर्निंग, दुधाचा उद्‍घोष करणारी आई, यासारख्या वेगवेगळ्या टॅगलाइनद्वारे भरवसा देणाऱ्या जाहिराती प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात घर करून राहतात. जाहिरात क्षेत्राचा वाढणारा प्रभावामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या नव्या संधी विकसित झाल्या आहेत. पूर्वी जाहिरात क्षेत्राला ६४ वी कला म्हटले जायचे. परंतु, सध्या कलास्वरूपात पाहिल्या जाणाऱ्या जाहिरातींशिवाय व्यवसाय करणे जवळजवळ अशक्य झाले आहे. त्यामुळे जाहिरातीद्वारे व्यावसायिक संवाद साधण्याचे महत्त्वपूर्ण साधन बनले आहे. यातूनच या क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी सातत्याने निर्माण होत आहेत.

सर्वसाधारणपणे जाहिरात क्षेत्रात ग्राहक संपर्क म्हणजेच क्लायंट सर्व्हिसिंग, मीडिया प्लॅनिंग, क्रिएटिव्ह डिपार्टमेंट, आर्ट डिपार्टमेंट, प्रॉडक्शन निर्मिती, अकाउंट, जनसंपर्क, व्यवसाय विकास यांसारख्या विविध विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात.

क्लायंट सर्व्हिसिंग

जाहिरात, व्यवसाय शोधण्यापासून, जाहिरातदार व्यवस्थापनाशी व्यावसायिक संपर्काद्वारे, समन्वयावर आधारित व्यवसाय निर्मिती या विभागाद्वारे करण्यात येते.

मीडिया प्लॅनिंग

सध्याच्या माध्यम क्षेत्रातील मोठ्याप्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या जाहिरात पर्यायांच्या पार्श्वभूमीवर जाहिरातदारांच्या अपेक्षेनुसार मुद्रित, दृकश्राव्य, संगणकीय, सावर्जनिक ठिकाणांवरील जाहिराती यांपैकी नेमकी निवड या विभागाद्वारे केली जाते. अशाच प्रकारची कामे जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या विविध विभागांद्वारे केली जातात. कामाचे स्वरूप लक्षात घेता जाहिरात व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रामुख्याने जाहिराती शिवाय विविध प्रकारच्या प्रसार माध्यमांची माहिती व त्यांची उपयुक्तता यांची अद्ययावत माहिती असणे आवश्यक असते. वाढत्या व्यावसायिक गरजांमुळे आकर्षक रोजगाराच्या जोडीलाच सर्जनशीलता व व्यावसायिकतेचा आकर्षक संगम या संधीमध्ये असतो.

जाहिरात क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क...

  • सर जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट््‌स, डॉ. दादाभाई नवरोजी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१

  • सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स, भारतीय विद्याभवनाजवळ, चर्नी रोड मुंबई-४००००४

  • राजेंद्र प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड मॅनेजमेंट कन्हैयालाल मुन्शी मार्ग, मुंबई-४०० ००७

  • झेव्हियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबई-४०००२६

  • सोफिया महाविद्यालय, बी.के. सोमणी पॉलिटेक्निक, मुंबई- ४०००२६

  • नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई-४०००५६

  • भवन्स कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड मॅनेजमेंट, मुंबई- ४००००७