वेध करिअरचा : फूड टेक्नॉलॉजीमधील संधी

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यांनतर बहुतेक विद्यार्थी तीन पर्यायांपैकी एकाची निवड करतात.
Food technology
Food technologySakal
Summary

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यांनतर बहुतेक विद्यार्थी तीन पर्यायांपैकी एकाची निवड करतात.

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यांनतर बहुतेक विद्यार्थी तीन पर्यायांपैकी एकाची निवड करतात. त्यांना बारावीत चांगले गुण मिळण्यास पहिला पर्याय म्हणजे इंजिनिअरिंग, दुसरा पर्याय म्हणजे वैद्यकीय शाखा होय. कमी गुण मिळाल्यास बीएसस्सी, म्हणजेच विज्ञान शाखेतील पदवी. याशिवाय सर्वसाधारणपणे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अन्य पर्याय सहसा सुचत नाही. त्यामुळे बारावीनंतर पुढे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. बारावीमध्ये कमी टक्के मिळाले म्हणून अन्य पर्याय स्वीकारण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी ‘फूड टेक्नोलॉजी’कडे अवश्य वळावे.

फूड टेक्नोलॉजीमध्ये अन्नपदार्थांचे उत्पादन करणे, ती दीर्घकाळ टिकवून ठेवणे, हवाबंद करून खाद्यपदार्थांचे मार्केटिंग करणे आदी प्रक्रियांचा समावेश आहे. अर्थात, यामध्ये फळे, भाज्या, अंडी, चहा-कॉफी, दुग्धजन्य पदार्थ आदी खाद्य पदार्थांचा समावेश आहे. देशात सुपरमार्केटची साखळी तयार झाल्यामुळे आणि ‘रेडी टू कूक’ व ‘टेस्टी टू इट’ची संज्ञा सर्वदूर रूढ झाल्याने, तसेच पॅकिंग टेक्नॉलॉजीमुळे मोठी क्रांती झाली आहे. याचाच अर्थ, फूड टेक्नॉलॉजी या शाखेतून तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, कँटीन, हॉटेल, रुगालयांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध असतात.

एकंदरीतच, नव्या पिढीच्या बुद्धिमत्ता व कार्यक्षमेतेला आव्हानपर चालना देणारे क्षेत्र म्हणून फूड टेक्नॉलॉजीकडे पाहण्यास हरकत नाही. फूड टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाकडे वळण्यासाठी अर्जदार उमेदवारांनी विज्ञान शाखेतील बारावीची परीक्षा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. विद्यार्थ्यांना बारावीनंतर चार वर्षांचा बीएसस्सी फूड टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. तसेच यातच पुढे याच विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही पूर्ण करता येतो.

याशिवाय सूक्ष्मजीवशास्त्र यांसारख्या विषयांसह पदवीधर उमेदवारांना त्यांनतर दोन वर्षांचा फूड टेक्नॉलॉजीमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. फूड टेक्नॉलॉजीमधील पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनंतर उद्योजकता किंवा स्वयंरोजगारासह गृहउद्योगाचा पर्यायही माफक गुंतवणुकीसह उपलब्ध आहे.

फूड टेक्नॉलॉजीमधील विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्रातील संस्थांचा संपर्क

  • डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई विद्यापीठ, मुंबई - ४००१०९

  • डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, अमरावती विद्यापीठ, अमरावती - ४४४६०२

  • लक्ष्मीनारायण इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी, अमरावती मार्ग, नागपूर - ४४०००१

  • कॉलेज ऑफ अँग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी इंजिनिअरींग, परभणी - ४३१४०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com