
YCMOUच्या MBA-CETच्या अर्जाची 'या' तारखेपर्यंत मुदत
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत (YCMOU) येणाऱ्या एमबीए (MBA) शिक्षणक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला गती आली आहे. एमबीए प्रवेशासाठी विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या एमबीए-सीईटी (MBA-CET) परीक्षेच्या नोंदणीप्रक्रियेस सुरवात झाली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना १४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन स्वरूपात ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.
...अशा प्रकारे करा नोंदणी
यासंदर्भात विद्यापीठाने सविस्तर दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार एमबीए शिक्षणक्रमासाठीची प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी पाचशे रुपये शुल्क असून, ते ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. परीक्षेसाठी नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना सराव चाचणी (Demo-mock test) आणि मुख्य प्रवेश परीक्षा देता येईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन लिंकचा वापर करत स्वतंत्ररीत्या प्रवेश अर्ज भरायचा आहे. प्रवेश अर्ज भरताना शिक्षणक्रम, अभ्यास केंद्र आणि विषयांची निवड करून प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. सीईटी परीक्षेच्या तारखेची घोषणा अद्याप केलेली नसून, उमेदवारांना यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: 35 बँकांचे पैसे ग्राहकांना मिळणार घरपोच! 'या' मिळणार सुविधा
बी. एड.साठी ३१ पर्यंत मुदतवाढ
बी. एड. विशेष शिक्षण या शिक्षणक्रमाच्या ऑनलाइन प्रवेशाची मुदत वाढविण्याचा निर्णय मुक्त विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देत ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.
हेही वाचा: शिवभोजन थाळी वितरणात विभागात 'नाशिक' जिल्हा अव्वल!
Web Title: Deadline For Ycmous Mba Cet Application Educational News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..