पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Study

कालबाह्य होत चाललेल्या पारंपरिक शिक्षणपद्धतीला छेद देत, कौशाल्याधारीत चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची मांडणी केली आहे.

पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा होणार

पुणे - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (Educational Policy) पदवी अभ्यासक्रम (Syllabus) चार वर्षांचा होणार आहे. चौथ्या वर्षाला कार्यानुभव आणि संशोधन अनिवार्य आहे. उद्योगाभिमुख किंवा कौशाल्याधारीत या अभ्यासक्रमांसाठी उद्योग, कृषी, वित्तीय आणि संशोधन संस्थांचा प्रत्यक्ष सहभाग अपेक्षित आहे. अशावेळी आवश्यक पायाभूत सुविधांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुरविणे महाविद्यालयांसाठी आव्हानात्मक असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कालबाह्य होत चाललेल्या पारंपरिक शिक्षणपद्धतीला छेद देत, कौशाल्याधारीत चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची मांडणी केली आहे. चौथ्या वर्षाची अर्थात सातव्या आणि आठव्या सत्राची रचना ही पूर्णतः संशोधन किंवा कार्यानुभवाच्या आधारे करणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर म्हणाले, ‘‘सातव्या सत्रातील अभ्यासक्रम हा त्या क्षेत्रातील व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करण्यात येईल. जेणेकरून उद्योगांची गरज ओळखून विद्यार्थ्यांना कौशल्य मिळतील. आठव्या सत्रात प्रत्यक्ष व्यावसायिक कार्यानुभव विद्यार्थ्यांना करायचा आहे.’’

याला द्यावे प्राधान्य

  • उद्योगांसह आरोग्य, विपणन, वित्तीय आणि कृषी क्षेत्राशी सहकार्य

  • स्थानिक गरजा आणि समस्यांच्या आधारे कार्यानुभवाची रचना उभी करने

  • संशोधनासाठी पायाभूत सुविधा उभारणीसह व्यावसायिक तज्ज्ञांचा सहभाग वाढविणे

  • शिक्षकांचे नियमित प्रशिक्षण

व्यावसायिकांची जबाबदारी

  • पदवीच्या विद्यार्थ्यांना कार्यानुभवासाठी व्यवस्था उभी करणे

  • व्यावसायाच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांना ‘प्रॉब्लेम स्टेटमेंट’ देणे

  • सामाजिक उत्तरदायित्व निधीतून महाविद्यालयांतच मनुष्यबळ विकासाचे प्रयत्न करणे

  • भविष्याची गरज ओळखून विद्यार्थ्यांना कौशल्य शिकविणे

पदवीच्या चौथ्या वर्षापर्यंत विद्यार्थ्याला रोजगाराभिमुख कौशल्याने परिपूर्ण करायचे आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रयोगशाळा शैक्षणिक संस्थांना उभाराव्या लागतील. त्याचबरोबर परस्पर सहकार्यही वाढवावे लागणार आहे. उद्योगांनीही भविष्यकालीन गरजा ओळखून महाविद्यालयांमध्ये आपला सहभाग वाढवायचा आहे.

- डॉ.मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

महाविद्यालयांनी खरं तर स्वतःचा पोर्टफोलिओच बनवायला हवा. आपल्या परिसरातील प्रश्नांचा अभ्यास करून, त्यावर उपाय सुचविणारे प्रशिक्षण अथवा प्रकल्प विद्यार्थ्यांना द्यायला हवे. व्यवसायांना लागणारी स्थानिक गरज ओळखून चौथ्या वर्षात प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध कराव्या लागतील.

- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Degree Course Will Be Of Four Years Duration Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationdegree syllabus
go to top