Delhi University Recruitment 2022: सहायक प्राध्यापक पदासाठी भरती, अर्ज कसा पाठवावा जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Assistant professor Du

Delhi University Recruitment 2022: सहायक प्राध्यापक पदासाठी भरती, अर्ज कसा पाठवावा जाणून घ्या

Delhi University Recruitment 2022 : दिल्ली विद्यापीठाच्या श्री गुरु तेग बहादूर खालसा कॉलेजने सहाय्यक प्राध्यापकाच्या अनेक पदांसाठी भरती करणार आहे. पात्र उमेदवार दिल्ली विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर du.ac.in च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात. पदांसाठी अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२२ पर्यंत आहे. (Delhi University Recruitment 2022 Assistant professor know How to apply)

या भरती अंतर्गत या भरती मोहिमेअंतर्गत इंग्रजीसाठी 7, पंजाबीसाठी 5, हिंदीसाठी 3, अर्थशास्त्रासाठी 4, इतिहासासाठी 4, राज्यशास्त्रासाठी 4, वाणिज्य शाखेसाठी 4, वाणिज्य शाखेसाठी 11, गणितासाठी 3, वनस्पतीशास्त्रासाठी 3, रसायनशास्त्रासाठी 6, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 2, सहायक कॉम्प्युटर सायन्सच्या 5 , भौतिकशास्त्राच्या 3 , प्राणीशास्त्राच्या 6 आणि पर्यावरण शास्त्राच्या 2 जागांसाठी प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी असले पाहिजे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.

निवड प्रक्रिया

स्क्रिनिंग समिती गुणांच्या आधारे सर्व उमेदवारांची यादी तयार करेल आणि ज्या उमेदवाराला ५० पेक्षा कमी गुण मिळाले असतील त्यांना निवडलेल्या उमेदवारांच्या यादीत समाविष्ट केले जाणार नाही. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाईल.

अर्ज शुल्क

UR/OBC/EWS श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु.500/- आहे, तर SC, ST, PWBD श्रेणी आणि महिला अर्जदारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. पेमेंट फक्त क्रेडिट / डेबिट कार्ड / नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन केले जाणे आवश्यक आहे.