प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येकी ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य केले आहे.
बंगळूर : कर्नाटकातील सरकारी शाळांमध्ये (Government School) शिक्षकांची तब्बल ५९ हजार ७७२ पदे रिक्त आहेत. त्यापैकी प्राथमिक शाळांमध्ये (Primary Schools) ५० हजार ६७ आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये नऊ हजार ७०५ पदे रिक्त आहेत. तसेच ६,१५८ शाळा केवळ एक शिक्षक चालवत आहेत.