- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
डिझाईन हे केवळ चित्रकलेपुरते मर्यादित न राहता विज्ञान, सौंदर्यशास्त्र, मानवी गरजा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारे एक व्यापक व्यावसायिक क्षेत्र आहे. आजच्या युगात डिझाइन हे ‘आर्ट’पेक्षा अधिक ‘सायन्स’ झाले आहे. ‘बॅचलर ऑफ डिझाइन (बी.डिझाइन)’ हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम हे क्षेत्र करिअरसाठी निवडणाऱ्या सर्जनशील विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय ठरतो.