

Educationist Dr Milind Naik says higher-order thinking skills can be developed only by transforming classroom teaching and assessment methods.
Sakal
डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
उच्चस्तरीय विचारकौशल्ये विकसित करायची असल्यास सर्वप्रथम वर्गातील अध्यापन पद्धतीत बदल करावा लागेल. शिक्षक हा केवळ माहिती सांगणारा नसून विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देणारा मार्गदर्शक असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाने सांगितलेले उत्तर स्वीकारण्यापेक्षा स्वतः प्रश्न विचारणे, विविध शक्यता तपासणे, पुरावे शोधणे आणि स्वतः निष्कर्षापर्यंत पोहोचणे हे करावे.