11th Admission : अकरावी प्रवेश अर्ज भरण्यास अडचणी; नोंदणी शुल्कांचे ऑनलाइन पैसे भरताना एरर

शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून कॅश पैसे भरून नोंदणी पूर्ण केली
Difficulties in filling 11th admission form Error while paying online fees
Difficulties in filling 11th admission form Error while paying online feessakal
Updated on

पिंपरी : अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात गर्दी केली होती. परंतू नोंदणी शुल्कांचे ऑनलाइन पैसे भरताना संकेतस्थळावर वारंवार एरर दाखवत होते.

शेवटी वैतागून शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून कॅश पैसे भरून नोंदणी पूर्ण केली. परिणामी, संकेतस्थळावर वारंवार येणाऱ्या अडचणीमुळे विद्यार्थी वैतागल्याचे चित्र पहायला मिळाले. बहुतांश विद्यार्थ्यांना निरनिराळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेची तयारी करण्याबाबत शिक्षण संचालनालयामार्फत संबंधित शिक्षण उपसंचालक कार्यालयांना सूचना करण्यात आल्या आहेत.

त्यानंतर शिक्षण संचालनालयामार्फत या प्रवेश प्रक्रियेचे नियोजन जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना नावनोंदणी तसेच अर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात केली आहे. आजपासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Difficulties in filling 11th admission form Error while paying online fees
Education Department Corruption : 15 लाख रुपयांचे कलेक्शन चर्चेत

पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनीही अर्जाचे पहिला भाग भरण्यासाठी महाविद्यालयात गर्दी केली होती. प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःची माहिती, आसन क्रमांक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला सादर करून अर्ज भरण्यात आले. विद्यार्थ्यांना अर्जाबरोबर दिलेल्या पुस्तकामध्ये महाविद्यालयांची माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांना नावनोंदणी तसेच अर्जाचा भाग १ भरण्यास सुरुवात केली. अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करून, लॉगइन आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर अर्जाचा भाग १ भरता येणार आहे. आवश्यक ती कागदपत्रेही विद्यार्थ्यांना जोडाली. पण ऑनलाइन शुल्क भरून अर्ज लॉक करता येणार आहे. पण नोंदणी शुल्कांचे ऑनलाइन पैसे भरताना संकेतस्थळ बंद पडत होते. त्यामुळे विद्यार्थी वैतागले होते.

Difficulties in filling 11th admission form Error while paying online fees
11th admission : 10 वी पास झाल्यानंतर पुढचा प्लॅन काय? ११ वी प्रवेशासाठीच्या चेकलीस्टमध्ये काय महत्वाचं?

‘‘अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास अडचणी आल्या. नोंदणी शुल्कांचे ऑनलाइन पैसे भरताना संकेतस्थळावर वारंवार एरर दाखवत होते. शेवटी वैतागून शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून कॅश पैसे भरून नोंदणी पूर्ण केली’’

-कपिल राऊतमारे, संगणक तज्ज्ञ शिक्षक, गेंदीबाई चोपडा हायस्कुल

‘‘महाविद्यालयात अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची चांगली सोय केली होती. पण पैसे भरण्यास अडचणी आल्‍या.’’

-गणेश गवई, विद्यार्थी

‘अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी सकाळपासून आले होते. पण अडचणीमुळे आज अर्ज भरता आला नाही. ’

-सुप्रिया जिडगे, विद्यार्थीनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com