esakal | Education : औषधनिर्माणशास्त्र डिप्लोमा व डिग्री प्रवेशाची तारीख एकच असावी : प्रा. रामदास झोळ
sakal

बोलून बातमी शोधा

औषधनिर्माणशास्त्र डिप्लोमा व डिग्री प्रवेशाची तारीख एकच असावी : प्रा. रामदास झोळ

अनेक विद्यार्थी पदवी औषध निर्माणशास्त्र प्रवेशासाठी उत्सुक असतात, पण पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अगोदर चालू झाल्याने याच विद्यार्थ्यांनी पदविका औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासही प्रवेश घेतलेला आहे.

'औषधनिर्माणशास्त्र डिप्लोमा व डिग्री प्रवेशाची तारीख एकच असावी'

sakal_logo
By
अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : औषध निर्माणशास्त्र (Pharmacology) पदविका (Diploma) व पदवी (Degree) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख एकच असावी व पदविका औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अजून एक फेरी घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना दिले आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट्‌स इन रुरल एरिया संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष प्रा. रामदास झोळ (Ramdas Jhol) यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना प्रा. झोळ यांनी सांगितले की, शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये पदविका औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जवळपास 75 हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत. परंतु दुसऱ्या फेरीच्या अखेरीस असे लक्षात येते की, महाविद्यालयाच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या जवळपास 30-35 टक्के प्रवेशाच्या जागा रिक्त राहात आहेत. अनेक विद्यार्थी पदवी औषध निर्माणशास्त्र प्रवेशासाठी उत्सुक असतात, पण पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अगोदर चालू झाल्याने याच विद्यार्थ्यांनी पदविका औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासही प्रवेश घेतलेला आहे व ज्या वेळेस पदवी औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेऱ्या चालू होतील तेव्हा ते विद्यार्थी पदविका औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द करतील. त्यामुळे महाविद्यालयाच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रवेशाच्या जागा रिक्त होतील आणि पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अभ्यासक्रमाच्या प्रतीक्षेत राहतील.

हेही वाचा: भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केली अप्रेंटिसशिप पदांची भरती!

या मागणीबाबत मंत्री उदय सामंत यांनी डिप्लोमा फार्मसीसाठी आणखी एक प्रवेश फेरी घेण्याबाबत तसेच डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेशाची अंतिम तारीख एक करण्याबाबत आश्वासित केले आहे. निवेदन देताना प्रा. रामदास झोळ यांच्या समवेत अलान्ना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य जगताप, फलटण फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मनोज फडतरे, जे. एस. पी. एम. चे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर, डी. वाय. पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. जंगमे आदी उपस्थित होते.

loading image
go to top