12th Exam Result : आईचं कृपाछत्र जन्म होताच हरवलं, बापानं लहानाचं मोठं केलं अन् जंगलात भटकणारा 'मोगली' झाला बारावी पास

ही कथा आहे संग्रामपूर (Sangrampur) येथील ज्ञानेश्वर रामदास दोडसे (Dnyaneshwar Ramdas Dodse) या विद्यार्थ्यांची.
12th Exam Result Dnyaneshwar Godse
12th Exam Result Dnyaneshwar Godseesakal
Summary

पोटा पाण्यासाठी बाहेर पडल्यावर त्याला शिक्षणाचे महत्व समजू लागले. आपण किमान दहावी असावे असे त्याचा मनाला वाटत होते.

संग्रामपूर : आईचे कृपाछत्र जन्म होताच हरवले. वडिलांनी लहानाचा मोठा केला. कुमार अवस्था येताच वडिलांचे पण निधन झाले. कसाबसा गावातील शाळेत गेला, तेथे मन लागत नव्हते. वर्गातील मुले चिडवत होती. त्यामुळे रागारागाने शाळा (School) सोडून दिली. पोट भरण्यासाठी रानावनात वणवण भटकत राहिला. मोल मजुरी केली, वाटेल ते कामे केली. घरदार नाही, सगे सोयरे, नातलग, सर्वांनी पाठ फिरवली. पोटा पाण्यासाठी उठसुठ जंगलात जात राहिला. जंगलतील (Forest) झाडे, फुले, फळे, नदी नाले, ओढे त्याचे सोबती झाले. जंगलचा वारा त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.

12th Exam Result Dnyaneshwar Godse
12th Exam Result : कोकण मंडळ सलग 13 वेळा राज्यात अव्वल; बारावीचा 97.51 टक्के निकाल, पुन्हा मुलीच आघाडीवर

सतत आकर्षित करीत होता. मोगली सारखा अवतार झाला. जंगलात भटकंती करता करता त्याची दमछाक झाली. अखेर शिक्षणाचे महत्व त्याला समजू लागले. आता दहावी बारावी पास (12th Exam Result) होण्याची उर्मी मनात घर करू लागली. अखेर शाळा बाह्य किंवा शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यासाठी असलेली बोर्डाची १७ नंबरची योजना कामी आली अन् या वर्षी ६१.५०% गुण घेऊन बारावीच्या परीक्षेत हा मोगली सारखा राहणारा ज्ञानेश्वर उत्तीर्ण झाला.

ही कथा आहे संग्रामपूर (Sangrampur) येथील ज्ञानेश्वर रामदास दोडसे (Dnyaneshwar Ramdas Dodse) या विद्यार्थ्यांची. घरात अठरा विश्व दारिद्रय वडील रामदास दोडसे पिंपळगाव देवी वरून पंचवीस वर्षा पूर्वी ह्या गावात मोलमजुरी साठी आले.एक मुलगी शितल अन् मुलगा ज्ञानेश्वर असे त्यांचे कुटुंब.ज्ञानेश्वर चा जन्म झाला अन् आईचे एका दुर्धर आजारात निधन झाले. कसा बसा वडील रामदास यांनी या दोन लेकरांचा सांभाळ केला. वडील पण मिळेल ते काम करू लागले अन् आपला प्रपंच चालवू लागले. आईच्या दुधाची गरज असणाऱ्या या शिशु अवस्थेतील ज्ञानेश्वरने वेळ प्रसंगी जंगलातील काळीभोर माती खाऊन दिवस काढले. गावा शेजारील पत्रकार काशिनाथ मानकर यांच्या शेतात आश्रयाने राहू लागला.

12th Exam Result Dnyaneshwar Godse
Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

पोटाची आग स्वस्थ बसू देत नव्हती, त्यामुळे शाळेची तर अजिबात गोडी नव्हती. शाळेत मन रमत नव्हते. नदी नाल्यातून जिवतीची फुले, जांभूळ, करवंद, सणासुदीला आंब्याची पाने, इंधनाच्या मोळ्या, मधाचे पोळे, रोडगेसाठी गोवऱ्याची पोते गल्ली बोळात जाऊन वडिलांसोबत विकू लागला. एके दिवशी वडील झाडावरून खाली पडले त्यांच्या कमरेचा बॉल गेला. चांगल्या दवाखान्यात जाण्याची सोय नव्हती. ते पण त्याला सोडून देवघरी निघून गेले. एकाकी पडलेले दोघे बहीण भाऊ सैरभैर झाले. शितल गुलाबबाबा विद्यालयात सायन्स शिकली तिचा आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे काशिनाथ व्यवहारे नामक देवदूत माणसाने सांभाळ केला. मोठी झाल्यावर पुण्यात नर्सिंग साठी ती निघून गेली अन् आज एका चांगल्या हॉस्पिटल मध्ये काम करते.

12th Exam Result Dnyaneshwar Godse
12th Exam Result : बारावीच्या निकालात पराक्रम! पुण्याच्या पठ्ठ्याला मिळाले 15%; मित्रांनी ठेवला स्टेट्स

शासनाची विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या योजनेत शाळेच्या पटावरून ज्ञानेश्वर आपोआप पुढील वर्गात सरकू लागला. अखेर दहाव्या वर्गात गेल्यावर तो परीक्षेला आलाच नाही, त्यामुळे तो नापास झाला. पोटा पाण्यासाठी बाहेर पडल्यावर त्याला शिक्षणाचे महत्व समजू लागले. आपण किमान दहावी असावे असे त्याचा मनाला वाटत होते. त्याचा दहावीला १७ नंबर अर्जाची माहिती दिली. तो दहावीत पास झाला. तेवढ्यावरच न थांबता परत बारावी पास होण्याचीची उर्मी त्याच्या मनात जागृत झाली. संत गुलाबबाबा विद्यालयातून प्राचार्य भाऊसाहेब थोटांगे, संस्था सचिव गोपाल रहाटे, क्रीडा शिक्षक सुधीर मानकर, गोर गरीब विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करणारे जगदीश राऊत यांनी मार्गदर्शन करून बारावीसाठी १७ नंचा अर्ज भरायला लावला अन् पहिल्याच प्रयत्नात तो या वर्षी उत्तीर्ण झाला.

२१ मे रोजी बारावीचा निकाल लागल्यावर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. उंचपुरा देह धिप्पाड असलेला हा ज्ञानेश्वर आता भारतीय सैन्य दलात किंवा पोलिस खात्यात जाण्यासाठी तयारीला लागला. त्या साठी तो मैदानात तयारी करतोय. आई-वडील नसलेल्या आणि शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या अन् परत आज या प्रवाहात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ज्ञानेश्वर एक आश्वासक चेहरा असेल, परंतु शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसोदूर जाऊन जंगलात वणवण भटकंती करणाऱ्या ज्ञानेश्वर सारख्या अनेक मोगली विद्यार्थ्यांसाठी ज्ञानेश्वर एक आयकॉन ठरेल. म्हणतात ना, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही ते हेच. या निकालाने त्याच्या आयुष्याची दशा पालटून एक नवी दिशा मिळेल आणि तो एक नवी उभारी घेईल एवढे नक्की!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com