लसीकरणा पूर्वी शाळा सुरू करू नका | School | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayashri Deshpande
लसीकरणा पूर्वी शाळा सुरू करू नका

लसीकरणा पूर्वी शाळा सुरू करू नका

सिंहगड रस्ता - राज्य मंत्रिमंडळाने नुकताच 1 डिसेंबर पासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर ग्रामीण भागात पहिली ते चौथी चे वर्ग सुरू होणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना अद्याप लसीकरण झालेले नाही. त्यामुळे लसीकरण झालेले नसताना शाळा सुरू करणे धोक्याचे आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला शाळा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, लसीकरण झालेले नसल्याने धोकादायक देखील आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वी लसीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: मराठी विज्ञान परिषदेतर्फे ऑनलाईन विज्ञान परीक्षा

इतर देशांचा विशेषतः युरोपियन देशातील सध्याची स्थिती च्या विचार केला तर त्या ठिकाणी पुन्हा लोक दोनच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तसेच, कोरोना ची तिसरी लाट जानेवारीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंबहुना त्याबाबत अद्यापही काही ही स्पष्टता मिळालेले नाही. अशा वातावरणात मुलांना लसीकरण न करता शाळेत पाठवणे धोकादायक होऊ शकते. म्हणून आधी मुलांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. मग शाळा सुरू करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पेरेंट्स स्टुडन्ट अँड टीचर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या विभाग प्रमुख जयश्री देशपांडे यांनी केली.

loading image
go to top