परीक्षेच्या काळात हे कराच...

अभ्यास आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या ताणांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. हाच ताण पालकांवरही असतो. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठीच्या काही टिप्स.
Do this during exams ssc hsc exam student study parents
Do this during exams ssc hsc exam student study parentsesakal
Summary

अभ्यास आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या ताणांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. हाच ताण पालकांवरही असतो. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठीच्या काही टिप्स.

पुढील महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या कालावधीमध्ये अभ्यास आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या ताणांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. हाच ताण पालकांवरही असतो. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठीच्या काही टिप्स.

मला आई-वडिलांना, शिक्षकांना, मित्रांना अपेक्षित मार्क पडतील का, ही शंका विद्यार्थ्यांच्या मनात असते. याचा ताण त्यांच्यावर येतो. सातत्याने विचार केल्यास ताण येत असल्याने सर्वप्रथम मार्कांचा ताण मनावरून काढून टाका. आनंदाने परीक्षेला सामोरे जा. एक परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही, हे लक्षात ठेवा.

स्वतःला काही सूचना द्या. माझा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि मला परीक्षेत सर्वकाही आठवणार आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी अचूकच लिहिणार आहे, अशा स्वयंसूचना स्वतःला द्या. यातून तुम्हाला ताण जाणवणार नाही आणि तुम्ही आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकाल.

परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या काळात दररोज सकाळी लवकर उठून, योगासने, प्राणायाम किंवा चालण्यासारखा हलका व्यायाम केल्यास तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल, ताण, भीती कमी होईल.

योग्य, पौष्टिक व हलका आहार घेतल्यास तुम्हाला आळस येणार नाही व शरीराला आवश्यक ऊर्जा मिळेल. वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन आणि वर उल्लेख केलेल्या गोष्टींतून सकारात्मक दृष्टिकोन तयार झाल्यास तुम्ही परीक्षेला अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकाल.

पालकांसाठी सूचना

  • आपल्या पाल्याची परीक्षा हा जीवन-मरणाचा प्रश्न करून नका.

  • आपल्या पाल्याची इतर विद्यार्थ्यांशी तुलना करणे टाळा

  • तुमच्या मुलाच्या क्षमता तुम्हालाच सर्वाधिक चांगल्या माहिती असतात, त्यामुळे त्याच्या बौद्धिक क्षमतांचा विचार करूनच अपेक्षा ठेवा. अवास्तव अपेक्षा मुलांवर अतिरिक्त दबाव आणतात.

  • अभ्यासासाठी मागे लागण्यापेक्षा त्याच्या कलाने घ्या, त्याला प्रेरणा द्या.

  • परीक्षेतील गुण हेच सर्वस्व आहे, हे त्याच्या मनावर बिंबवू नका.

  • पाल्याचा आहार योग्य आहे का, त्याची झोप व्यवस्थित होते का याकडे लक्ष द्या.

  • मुलाला गॅजेट्सपासून दूर ठेवा, या काळात तुम्हीही हा नियम शक्यतो पाळा.

  • परीक्षा देऊन आल्यावर त्याला प्रश्नपत्रिकेबद्दल सारखे विचारून दबाव आणू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com