संवाद : आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समधील संधी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स प्रोग्रॅममध्ये पदवी घेतलेले उमेदवार उद्योगातील विविध समस्या हाताळण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित व्यवसाय करण्यास सक्षम ठरतील.
artificial intelligence
artificial intelligencesakal
Summary

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स प्रोग्रॅममध्ये पदवी घेतलेले उमेदवार उद्योगातील विविध समस्या हाताळण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित व्यवसाय करण्यास सक्षम ठरतील.

- डॉ. अमित आंद्रे

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स हे अभ्यासाचे आधुनिक क्षेत्र आहे. सांख्यिकी, संज्ञानात्मक विज्ञान आणि संकलन आणि माहिती विज्ञान यांसारख्या विविध विभागांमधल्या वैज्ञानिक पद्धती, प्रक्रिया आणि तंत्रांचा वापर केला जातो. उत्तमरीत्या संकलित केलेल्या, तसेच विविध ठिकाणी विखुरलेल्या डेटामधून उपयुक्त माहिती एकत्रित जमा करण्याशी हे क्षेत्र संबंधित आहे.

हे ज्ञान विविध बौद्धिक निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक ॲप्लिकेशन्समध्ये वापरले जाते. डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन्ही गोष्टी माहिती संकलित करणे, माहितीचे व्यवस्थित वर्गीकरण करणे, नियोजन आणि विश्लेषण करणे तसेच त्याचा योग्य अर्थ लावणे याच्याशी संबंधित आहेत. हा डेटा सायन्सचा एक उपप्रकार आहे. तो डेटा-आधारित साधने, डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स आणि मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करण्याच्या पद्धतींच्या निर्मितीशी संबंधित आहे. असंख्य संगणकीय आणि वास्तविक-जगातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी यात मशिन लर्निंग आणि डीप लर्निंग मॉडेल विकसित करण्याच्या संकल्पना समाविष्ट आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स प्रोग्रॅममध्ये पदवी घेतलेले उमेदवार उद्योगातील विविध समस्या हाताळण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित व्यवसाय करण्यास सक्षम ठरतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स टूल्स या तंत्रांचा वापर करून, हे पदवीधर डेटा हाताळणे, मोबाईल आणि डिस्ट्रिब्युटेड ॲप्लिकेशन्स बनविणे, ए-आय आधारित वेबसाइट किंवा ईकॉमर्स वेबसाइट बनविणे, डेटाबेसवर नियंत्रण ठेवणे, हार्डवेअर, नेटवर्किंग, शिक्षण आणि प्रशिक्षण यांवर आधारित सेवा पुरवू शकतात.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स हे सध्याचे उद्योगातले उत्तम पगार किंवा उत्पन्न देऊ शकणारे ट्रेंड आहेत. विविध प्रकारच्या करिअर ऑप्शन्सनी समृद्ध असा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स एक चांगला अभ्यासक्रम आहे. या संशोधनाचा उत्पादन, ई-कॉमर्स, वित्त, वाहतूक, बँकिंग आणि आरोग्यसेवा यांच्याशी निगडित उद्योगांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत आहे. आगामी काळात सर्व क्लिष्ट निर्णय घेण्याच्या दृष्टीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या डेटाचा योग्य अर्थ लावण्यात आणि त्याविषयी आवश्यक निर्णय घेण्यासाठी संगणकामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित प्रोग्रॅमिंग केले जाते. एआय (आणि त्याची मशिन लर्निंगची तार्किक प्रगती) आणि डीप लर्निंग या दोन वेगवेगळ्या संज्ञा आहेत ज्यांचा अनेकदा परस्परसंबंध जोडला जातो. डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्यवसायाचा कायापालट होत आहे, छोट्या कंपन्यांपासून ते बहुराष्ट्रीय कंपन्या आणि अगदी सरकारी एजन्सीजपर्यंत हा बदल पाहावयास मिळतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते २०२५ पर्यंत डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित ५ कोटी ८० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. थोडक्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स स्किल इंडियाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण क्षेत्र ठरणार आहे.

(लेखक ‘द डेटा टेक लॅब’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com