भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्तानेसंबंधी कामाचे स्वरूप 

डॉ. आशिष तेंडुलकर 
Thursday, 14 May 2020

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील कामाचे स्वरूपनेमके कसे असते,याक्षेत्रात काम करण्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागेल,नोकरीसाठी मुलाखतीचे स्वरूप कसे असते याप्रश्नाकडे वळूया.

आपल्या या लेखमालेमध्ये आतापर्यंत आपण कृत्रिम बुद्धिमत्तेची ओळख करून घेतली, त्यातील विविध टप्पे आणि व्यवहारातील काही उदाहरणे पाहिली. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील कामाचे स्वरूप नेमके कसे असते, या क्षेत्रात काम करण्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागेल, नोकरीसाठी मुलाखतीचे स्वरूप कसे असते या प्रश्नाकडे वळूया. आजच्या लेखामध्ये आपण या क्षेत्रातील कामाचे नेमके स्वरूप समजावून घेऊयात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध क्षेत्रातील खासगी आस्थापनांमध्ये (कंपनी) कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पटींनी वाढलेला आहे. यामागे विदा किंवा माहितीची तुलनात्मकदृष्ट्या सहज उपलब्धता, उन्नत संगणकीय विज्ञान, केंद्रीय संगणन (क्लाऊड कॉम्पुटिंग) पद्धतीद्वारे केली जाणारी माहिती प्रक्रिया आणि अशा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चढत्या वापरासाठी पोषक वातावरण तयार केले आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधातील प्रकल्पावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा समावेश असतो. प्रकल्पाची सुरुवात एखाद्या व्यवसायासंबंधी प्रश्नातून होते. उदा. एखाद्या साखळी किराणा व्यवसायामध्ये विक्रीची वाढ कशी करता येईल, हा प्रश्न सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. अशा प्रकल्पामध्ये व्यवसायातील मंडळी, संगणक अभियंते, व्यवसाय विश्लेषक, कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ आदींच्या एकत्रित प्रयत्नातून मूळ प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला जातो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१. व्यवसाय तज्ज्ञ आणि विश्लेषक नेमकेपणाने प्रश्न मांडण्यात मदत करतात. विश्लेषक प्रश्नांचे विविध कंगोरे आलेखाच्या माध्यमातून समजावून देण्याचा प्रयत्न करतात. 

२. व्यवसाय तज्ज्ञ आणि विश्लेषक याच्याबरोबर चर्चा करून कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ व्यवसाय प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रारूपामध्ये मांडतात. 

३. त्यानंतर माहिती कुंभामध्ये विदित माहितीद्वारे तालीम संच तयार करण्याचे काम संगणक अभियंते करतात. 

४. तालीम संचाद्वारे प्रारूपाची तालीम ही यातील पुढची पायरी. एकदा प्रारूप तयार झाल्यावर त्याद्वारे मिळणाऱ्या उत्तराची उपलब्ध माहिती बरोबर पडताळणी करावी लागते. ही उत्तरे उपलब्ध माहितीशी एका ठराविक पातळीवर मिळतीजुळती असल्यास असे प्रारूप व्यावसायिक वापरासाठी वापरले जाते, अन्यथा नवीन प्रारुप विकसित करावे लागते. 

५. पायरी ४ मध्ये निवडलेले प्ररून संगणक प्रणालीमध्ये जोडण्याचे काम संगणक अभियंते करतात. 

अशाप्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार झालेले प्रारूप व्यवसायातील ठराविक प्रश्नांची उकल करण्यासाठी वापरले जाते. ही तयार झालेली प्रारूपे १०० टक्के बरोबर उत्तरे देतील याची खात्री नसते. मग ती कशी निवडली जातात आणि त्याचा वापर कसा केला जातो हे आपण पुढील लेखात पाहूया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr ashish tendulkar article about Artificial Intelligence