भविष्य नोकऱ्यांचे  : महादुकाने आणि व्यक्तिगत माहितीची महती

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 23 July 2020

मागील दोन लेखांमध्ये  आपण कृत्रिम बुद्धिमत्तेची काही  उदाहरणे बघितली. ही उदाहरणे पाहून  आपणास असे  वाटणे स्वाभाविक आहे की या तंत्राचा  वापर ऑनलाइन  प्रणालींपुरताच मर्यादित आहे.

मागील दोन लेखांमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्तेची काही उदाहरणे बघितली. ही उदाहरणे पाहून आपणास असे वाटणे स्वाभाविक आहे की या तंत्राचा वापर ऑनलाइन  प्रणालींपुरताच मर्यादित आहे. आज आपण एक ऑफलाईन गटातील एक उदाहरण पाहणार आहोत.  

करोनापूर्व जगात आपण सर्व खरेदी मॉल किंवा मोठ्या किराणा दुकानातून खरेदी करत होतो - आजही कमी अधिक प्रमाणात करतो जशी ताळेबंदीतून सवलत मिळेल तशी.  या महादुकानांमध्ये ग्राहकाला मुक्त वावर असतो आणि आपल्याला हवी ती वस्तू निरखून पारखून आपल्या खरेदी पिशवीत (बास्केट) टाकण्याची मुभा असते.  अश्या वस्तू विकत घेऊन आपण त्या शेवटी एकदा का रीतसर देयक चुकते करून खरेदी केल्या की त्यातून ही महादुकाने खरेदी शैलीबद्दल महत्वाची माहिती गोळा करत असतात.  या माहितीमध्ये आपण एका खेपेत खरेदी केलेल्या सामानाच्या यादीच मुख्यत्वे समावेश होतो. ही माहिती साधारणपणे अशी दिसतात: 

 यामधून एका खेपेत कोणत्या वस्तू एकत्रित खरेदी केल्या जातात याची माहिती मिळवता येते.  या व्यतिरिक्त प्रत्येक वस्तूचे खरेदी प्रमाण - नग किंवा वजनाप्रमाणे आणि देयकाची रक्कम याचाही वापर केला जातो.   याव्यतिरिक्त लॉयल्टी कार्ड किंवा अन्य तत्त्सम कार्डच्या माध्यमातून आपली खाजगी माहिती मिळविली जाते आणि या दोन्ही माहितीकुंभांची जोडणी करून महादुकानांना  आपल्या ग्राहकांबद्दल व्यावसायिक दृष्ट्या अतिशय उपयुक्त माहिती मिळते.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या माहितीचा उपयोग करून ग्राहकांची सामान खरेदीची शैली शिकता येते. साधारणतः: एकत्र खरेदी होणाऱ्या वस्तू दुकानात जवळजवळ ठेवता येतात किंवा दोन टोकांना.  अशा रचनेमुळे  जास्तीत जास्त वस्तूंची विक्री करणे महादुकानांना शक्य होते.  आपणही या दुकानांमध्ये गेल्यावर ठरविलेल्या वस्तूंपेक्षा अधिक वस्तू आणतो ते यामुळेच! आहे की  नाही गम्मत!   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याव्यतिरिक्त आपल्याला देण्यात येणाऱ्या सवलती यासुद्धा यावरूनच ठरविल्या जातात.  सर्वसाधारणपणे या सवलती आपण न घेत असलेल्या किंवा क्वचितच खरेदी करत असलेल्या  वस्तूंवर  असतात.  सवलतींमध्ये अशा दोन वस्तू एकत्र केल्या जातात ज्या सहसा एकत्र खरेदी केल्या जात नाहीत.  तर मित्रानो अशी आहे आपल्या माहितीची शक्ती आणि क्षमता - म्हटली तर ती ग्राहक हितासाठी वापरता येते किंवा आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी.

देयक १ 
दूध, पाव, टोमॅटो, काकडी

देयक २   
तांदूळ, तूरडाळ, मुगडाळ, शेंगतेल, तिखट, हळद

देयक ३   
दूध, दही, पाव, तूप, श्रीखंड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Ashish Tendulkar article about Offline system

Tags
टॉपिकस
Topic Tags: