
जीवशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान यांची एकत्रित शाखा म्हणजेच बायोइन्फर्मेटिक्स. कॉम्प्युटर आणि जीवशास्त्र यांची एकत्रित शाखा म्हणजेच कॉम्प्युटेशनल बायॉलॉजी.
टेक करिअर : ‘जीवशास्त्र’ करिअर मॅप
दहावीच्या गुणांवर आधारित फिजिक्स, केमिस्ट्री, आणि बायॉलॉजी म्हणजेच (पीसीबी) या ग्रुपची निवड करून मूलभूत विज्ञान शाखेत बीएससी अथवा बीएस्सी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बायॉलॉजी या मूलभूत अभ्यासक्रमावर आधारित पूरक कौशल्यांद्वारे आपण विविध क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकतो. याच कौशल्यांवर आधारित काही निवडक विषयांसह करिअर मॅप सोबत देत आहे.
जीवशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान यांची एकत्रित शाखा म्हणजेच बायोइन्फर्मेटिक्स. कॉम्प्युटर आणि जीवशास्त्र यांची एकत्रित शाखा म्हणजेच कॉम्प्युटेशनल बायॉलॉजी. जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान आदींचा मिलाफ बायोटेक्नॉलॉजी या शाखेत झाला आहे. अशी अनेक उदाहरणे नवनवीन शाखांच्या व अभ्यासक्रमांच्या स्पेशलायझेशनची असून या कौशल्यांद्वारे आपण विशिष्ट शाखेत करिअर करू शकतो.
बायॉलॉजी (जीवशास्त्र) या विषयाशी निगडित जेनेटिक्स, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मॉलेक्युलर बायॉलॉजी, सेल बायॉलॉजी, मरीन बायॉलॉजी, बायोफिजिक्स, ईव्होल्युशनरी बायॉलॉजी, डेव्हलपमेंटल बायॉलॉजी अशा जवळजवळ १८ शाखांहून अधिक उपशाखांचा उदय आणि विकास झालेला आहे तसेच या शाखांमधील प्रगत तंत्रज्ञानाने कौशल्याधारित अनेक नवनवीन संधी निर्माण केलेल्या आहेत. बायोटेक्नॉलॉजी मॅनेजमेंट या शाखेचा ही विकास झाला आहे. या शाखेत एम.बी.ए. सारखी पदवी प्राप्त करता येऊ शकते.
इयत्ता अकरावी बारावीसाठी पीसीबी हा ग्रुप घेतलेल्या युवकांना मूलभूत विज्ञानासह वैद्यकीय तसेच अनेक उपवैद्यकीय शाखांचे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. डायटिक्स, न्यूट्रिशन, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, ऑप्ल्थॉमोलॉजी, एक्स-रे टेक्नॉलॉजिस्ट, नर्सिंग आदी अनेक उपवैद्यकीय शाखा उपलब्ध आहेत.
चाइल्ड नर्सिंग, कार्डियाक नर्सिंग, सेलिब्रल नर्सिंग, आयसीयू नर्सिंग असे अनेक सुपर स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम उपलब्ध आहे. उपवैद्यकीय शाखांमध्ये विशिष्ट प्रकारच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमांची जोड पूरक ठरत आहे. याच अभ्यासक्रमांद्वारे सर्टिफाइड पॅरामेडिकल क्वॉलिटी सुपरवायझर-मॅनेजर-ऑडिटर आदी अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. नर्सिंग व अन्य अभ्यासक्रम केलेले युवक-युवती हे अनेक परदेशी भाषाही शिकत असून त्या भाषेनुसार परदेशातील नोकरीच्या संधींचा उपयोग उज्ज्वल भवितव्यासाठी करत आहेत.
उपवैद्यकीय शाखांशी निगडित व्यवस्थापन शाखेची दहाहून अधिक स्पेशलायझेशनस् ही करिअर मॅपिंगसाठी तसेच भविष्यातील यशस्वी व्यवसायवृद्धीसाठी उपयोगी पडत आहेत. कोविड पश्चात जीवशास्त्र विषयाशी संबंधित अनेक क्षेत्रात लागणाऱ्या नवकौशल्यांची माहिती फायदेशीर ठरणार आहे.
करिअर मॅप
जीवशास्त्र विज्ञान शाखा
कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम
१) व्यवस्थापन शास्त्र
२) माहिती तंत्रज्ञान कौशल्य (आयटी स्किल)
३) बायोटेक्नॉलॉजी
४) उप वैद्यकीय शाखा - मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, फिजिओथेरपी, बायो इन्फर्मेटिक्स आदी
स्पर्धा परीक्षा
एम. पी. एस. सी.
यु. पी. एस. सी.
अन्य स्पर्धा परीक्षा
करिअर विषयक बहुविध पर्याय
१) डिप्लोमा इन नर्सिंग
२) डिप्लोमा इन अॅडव्हान्सड् कॉम्प्युटिंग
३) एम.बी.ए.
४) डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग
५) डिप्लोमा इन फूड अॅण्ड न्यूट्रिशन
६) हॉस्पिटल मॅनेजमेंट
नोकरी पर्याय
हॉस्पिटलमध्ये विविध पदांवर
स्वयंरोजगार
उप वैद्यकीय व्यवस्थापक
Web Title: Dr Deepak Tatpuje Writes Biology Career Education
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..