डिजिटल स्किल : डेटा सेट व्हिज्युअलायझेशन

डिजिटल माध्यमांमध्ये गोळा केलेली माहिती आकर्षक दर्शनीय स्वरूपात कल्पकतेने सादर करण्यासाठी ‘डेटा सेट व्हिज्युअलायझेशन’ची विविध टूल्स आणि वापराची कौशल्ये महत्त्वपूर्ण आहेत.
data set visualization
data set visualizationsakal
Summary

डिजिटल माध्यमांमध्ये गोळा केलेली माहिती आकर्षक दर्शनीय स्वरूपात कल्पकतेने सादर करण्यासाठी ‘डेटा सेट व्हिज्युअलायझेशन’ची विविध टूल्स आणि वापराची कौशल्ये महत्त्वपूर्ण आहेत.

डिजिटल माध्यमांमध्ये गोळा केलेली माहिती आकर्षक दर्शनीय स्वरूपात कल्पकतेने सादर करण्यासाठी ‘डेटा सेट व्हिज्युअलायझेशन’ची विविध टूल्स आणि वापराची कौशल्ये महत्त्वपूर्ण आहेत. मानवी मेंदूला नकाशा किंवा आलेखासारख्या दृश्य संदर्भांद्वारे डेटा समजवणे आणि त्यामधून विश्लेषणात्मक निष्कर्ष काढणे सोपे करणे आदींसाठी याचा उपयोग होतो. डेटा व्हिज्युअलायझेशनचे मुख्य उद्दिष्ट हे मोठ्या डेटा सेटमध्ये नमुने, ट्रेंड आणि मर्यादा व व्याप्ती ओळखण्याची प्रक्रिया सोपे करणे हा आहे. डेटा हा तथ्यांचा संग्रह आहे, तर माहिती त्या तथ्यांना संदर्भासह एकत्र ठेवत असल्याने या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

अन्वेषण, विश्लेषण, संश्लेषण आणि सादरीकरण हे ‘डेटा व्हिज्युअलायझेशन’ विविध टप्पे आहेत. ‘डेटा मायनिंग’ ही परिणामांचा अंदाज लावण्यासाठी मोठ्या डेटा सेटमध्ये विसंगती, नमुने आणि सहसंबंध शोधण्याची प्रक्रिया आहे. या दोन्ही तंत्रांच्या विस्तृत श्रेणींचा कौशल्यपूर्ण वापर करून ही माहिती महसूल वाढवण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी, ग्राहक संबंध सुधारण्यासाठी, जोखीम कमी करण्यासाठी आणि अन्य काही करण्यासाठी वापरू शकतो.

‘डेटा व्हिज्युअलायझेशन’ म्हणजे माहिती आणि डेटाचे ग्राफिकल प्रतिनिधित्व. चार्ट, आलेख आणि नकाशे यासारख्या व्हिज्युअल घटकांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करण्यात ही टूल्स महत्त्वाची भूमिका बजावतात. बिग डेटाच्या जगतातही, मोठ्या प्रमाणावर माहितीचे विश्लेषण करण्यासाठी आणि डेटा-चालित निर्णय घेण्यासाठी डेटा व्हिज्युअलायझेशन साधने आणि तंत्रज्ञान टूल्स आवश्यक आहेत. या प्रक्रियेत सहज माहिती शेअर करणे, परस्परसंवादीपणे संधी एक्सप्लोर करणे, नमुने आणि नातेसंबंधांची कल्पना करणेही सहज शक्य आहे.

डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स हे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आहेत. अशा साधनांमुळे मोठ्या प्रमाणात डेटासेट सहजपणे विविध पातळ्यांवर समजून घेणे व योग्य ठिकाणी त्यांचा वापर करणे सोपे झाले आहे.

काही सर्वोत्तम डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्समध्ये गुगल चार्ट्स, गुगल डेटा स्टुडिओ, टॅब्लु, ग्राफ, चार्टिस्ट, फ्यूजनचार्ट्स, डेटारॅपर, इन्फोग्राम, फ्युजन चार्ट, लिफलेट आणि चार्टब्लॉक्स इत्यादींचा समावेश होतो. ही साधने विविध प्रकारच्या दृश्यशैलींना (व्हिज्युअल) समर्थन देतात आणि वापरण्यास सोपी असतात तसेच मोठ्या प्रमाणात डेटा हाताळण्यास सक्षमही असतात. ट्री मॅपसह अन्य वैशिष्ट्यपूर्ण श्रेणीबद्ध तंत्र कौशल्ये हे भाग-टू-संपूर्ण संबंध स्पष्ट करण्यासाठी एक शक्तिशाली प्रक्रिया असल्याने अनेक रोजगार विविध आस्थापनांमध्ये उपलब्ध होत आहेत.

डेटा आणि डेटाबेस दिवसेंदिवस महत्त्वाचा होत आहे. कोणत्याही संस्थेसाठी, कामासाठी, महत्त्वपूर्ण निर्णय घेताना डेटा किती महत्त्वाचा आहे हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे डेटा व्हिज्युअलायझेशन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सर्वसाधारणपणे, डेटा व्हिज्युअलायझेशनचे दोन भिन्न प्रकार लोकप्रिय आहेत ज्यामध्ये अन्वेषण हे तुम्हाला डेटा सांगत असलेली कथा शोधण्यात मदत करते आणि दुसरे स्पष्टीकरण, हे प्रेक्षकांना कथा सांगते. दोन्ही प्रकारच्या डेटा व्हिज्युअलायझेशन प्रक्रियांनी या क्षेत्रात अनेक नवनवीन आयाम निर्माण केले असून या प्रक्रियांची कौशल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. डेटा सेट व्हिज्युअलायझेशनमध्ये रिअल टाइम डेटा, व्हिडिओ इन्फोग्राफिक्स, ग्रेडियंटस, मोबाईल फ्रेंडली व्हिज्युलायझेशन, सर्वे इन्फोग्राफिक्स आदी प्रचलित ट्रेंड्समध्ये अनेक नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com