डिजिटल स्किल : शाश्वत विकासासाठी डिजिटल ग्रीन स्किल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digital Skills

डिजिटल ग्रीन स्किलच्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेमध्ये टिकाऊपणा, पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि उत्पादन, घटक आणि साहित्य अर्थव्यवस्थेत फिरत ठेवण्यासाठी पुनर्वापरासाठी डिझाइन करणे आदी विविध कार्ये केली जातात.

डिजिटल स्किल : शाश्वत विकासासाठी डिजिटल ग्रीन स्किल्स

पुढील पिढीला हरित, डिजिटल, सर्वसमावेशक अर्थव्यवस्था, शाश्व़त विकास, पर्यावरण पूरक आणि वर्तुळाकार अर्थकारणासाठी (सर्कुलर इकॉनॉमी) प्रशिक्षित करणे यासाठी डिजिटल ग्रीन स्किल्सचा प्रामुख्याने वापर केला जातो. अनेक वेळा विशेष प्रगतशील कार्यांद्वारे हवामान व पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासासाठीही डिजिटल ग्रीन स्किल हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. डिजिटल ग्रीन कौशल्यांमध्ये धोरणात्मक आणि नेतृत्व कौशल्यांबरोबरच योग्य पर्यावरण पूरक आणि स्वच्छ उत्पादन आणि स्वच्छ वाहतूक यासारख्या उद्दिष्टांसाठी धोरणकर्ते आणि व्यावसायिक अधिकारी यांना अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासही सक्षम करते.

डिजिटल ग्रीन स्किलच्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेमध्ये टिकाऊपणा, पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि उत्पादन, घटक आणि साहित्य अर्थव्यवस्थेत फिरत ठेवण्यासाठी पुनर्वापरासाठी डिझाइन करणे आदी विविध कार्ये केली जातात. डिजिटल ग्रीन प्लॅटफॉर्मद्वारे मागील आणि रिअल टाइम डेटा तसेच आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापित करू शकतो. त्यामुळे कचरा कमी होतो आणि टिकाऊ ऑपरेशन्स वाढवता येतात. डिजिटल ग्रीन तंत्रज्ञान पुनर्निर्मिती आणि पुनर्वापरासाठी सर्वोत्तम पद्धतींचे मूल्यांकन करून कचरा काढून टाकून अनेक प्रकारे शाश्वत मूल्य निर्माण करू शकते. बिग डेटा, आयओटी, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि ब्लॉकचेन यांसारखी तंत्रज्ञान कार्यक्षमता वाढवून आणि कार्यप्रदर्शन सुधारून मूल्य निर्मितीला अनुकूलता करू शकते. ओपन इनोव्हेशन प्लॅटफॉर्ममध्ये सामाईक करण्यासाठी डिजिटल आणि ग्रीन पायलट कल्पना डिझाइन करण्यासाठीही अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. बहुसंख्य सार्वजनिक प्रशासन, समुदाय-आधारित उपक्रम, संशोधन संस्था, मेकर स्पेस आणि फॅब लॅब आणि औद्योगिक संघटनांच्या समूहाने तयार केलेल्या डायनॅमिक कॅटलान इनोव्हेशन इकोसिस्टमद्वारेही याचा उपयोग करतात.

डिजिटल परिवर्तनाचा हा एकात्मिक दृष्टिकोन, वैयक्तिक क्षमता आणि नावीन्यपूर्ण भावना या तरुणांच्या रोजगारक्षमतेची आणि उत्पादक क्षेत्रांची शाश्वतता या आव्हानांना तोंड देण्यासाठी अद्वितीय शाखा आहे. हवा, सौर ऊर्जा आदी ऊर्जा आणि उत्सर्जन-केंद्रित अर्थव्यवस्थेपासून स्वच्छ आणि हरित उत्पादन आणि सेवा पद्धतींमध्ये संक्रमण आणि पुनर्वापर करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात हरित डिजिटल कौशल्ये महत्त्वपूर्ण आहेत.

पर्यावरण शाखेतील तंत्रज्ञांना डार्क स्काय, ओपन वेदर, व्हिज्युअल क्रॉसिंग,एरिज वेदर आदी टुल्सद्वारे हवामान अंदाज कौशल्य विकसित करणे शक्य आहे. डिजिटलायझेशन आणि हरित उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन हरित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणीय समस्यांमध्ये अधिक सहभागी होण्यासाठी ‘पर्यावरणीय जबाबदार’ नोकऱ्या निर्माण होत आहेत. डिजिटल ग्रीन ही संकल्पना उद्योजक आणि एमएसएमईंना हरित उत्पादने आणि सेवांमध्ये गुंतवणूक आणि व्यापार करून वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यामुळेच या क्षेत्रात अनेक रोजगार निर्माण होत आहेत.

वर्तुळाकार अर्थव्यवस्थेच्या वाढत्या महत्त्वाचा नोकऱ्यांच्या संख्येवर आणि क्षमतांवर लक्षणीय परिणाम होईल. सर्कल इकॉनॉमीबाबत नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार डिजिटल ग्रीन साक्षरता आणि समस्या सोडवणे यामध्ये व्यापक कौशल्ये म्हणजेच ट्रान्सव्हर्सल स्किल समाविष्ट असतील. विशिष्ट कार्यक्षमतेशी संबंधित ‘सखोल कौशल्ये’ तयार करताना किंवा पुनरावृत्ती न होणाऱ्या, गोलाकार नोकऱ्या, दीर्घायुष्य सुधारण्यासाठी उत्पादन दुरुस्ती आणि देखभाल तसेच उत्पादन डिझाइन प्रक्रियेत नावीन्य आणण्यासारख्या कौशल्यांवर भर दिल्यामुळे हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित होऊन रोजगारनिर्मिती होत आहे.