डिजिटल स्किल : डिजिटल फॉरेन्सिक सायन्स

डिजिटल फॉरेन्सिक सायन्स ही अशी एक बहुविध शाखा (मल्टीडिसिप्लिनरी) आहे. ती डिजिटल उपकरणे आणि सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करते.
digital forensic science
digital forensic sciencesakal
Summary

डिजिटल फॉरेन्सिक सायन्स ही अशी एक बहुविध शाखा (मल्टीडिसिप्लिनरी) आहे. ती डिजिटल उपकरणे आणि सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करते.

डिजिटल फॉरेन्सिक सायन्स ही अशी एक बहुविध शाखा (मल्टीडिसिप्लिनरी) आहे. ती डिजिटल उपकरणे आणि सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करते. माहिती तंत्रज्ञानातील विविध उपकरणांच्या सर्वच क्षेत्रातील वाढत्या वापरामुळे या शाखेचे महत्त्व आणि आवश्यकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वसाधारणपणे डिजिटल फॉरेन्सिकमध्ये संगणक फॉरेन्सिक, मोबाईल डिव्हाईस फॉरेन्सिक, नेटवर्क फॉरेन्सिक, फॉरेन्सिक डेटा अॅनालिसिस, आणि डेटाबेस फॉरेन्सिक या पाच शाखांचा समावेश होतो.

क्लिष्ट समस्यांचा अभ्यास करणे आणि सोडवणे हा या क्षेत्रातील कार्याचा एक महत्त्वाचा भाग असल्याने, एक चांगला फॉरेन्सिक शास्त्रज्ञ अत्यंत विश्लेषणात्मक असतो. फॉरेन्सिक शास्त्रज्ञ कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा गंभीर माहिती प्रदान करण्यासाठी वैज्ञानिक पद्धती आणि पुरावा चाचणी वापरतात.

एखाद्या डिजिटल गुन्ह्याचा थेट पुरावा ओळखण्यासाठी, डिजिटल फॉरेन्सिकचा वापर हा विशिष्ट संशयितां संदर्भात पुराव्याचे दाखले देण्यासाठी, विधानांच्या पुष्टी करण्याबरोबरच हेतू निश्चित करण्यासाठी, स्रोत ओळखण्यासाठी किंवा दस्तऐवजांचे प्रमाणीकरण करण्यासाठीही केला जाऊ शकतो.

डिजिटल फॉरेन्सिक्समध्ये करिअरसाठी अनेक कौशल्य विकसित झाली आहेत. विविध तंत्रज्ञानाचे ज्ञान, डिजिटल स्टोअरेज उपकरणे, संगणक ऑपरेटिंग सिस्टम, डिजिटल फॉरेन्सिक संगणक विश्लेषण, संगणक प्रोग्रॅमिंग, मालवेअर प्रकार, डेटा संबंधित नैतिक समस्या, डेटा संबंधित कायदेशीर समस्या, नवतंत्रज्ञान गोष्टी शिकण्याची क्षमता आदी कौशल्यांचा यामध्ये समावेश आहे. फॉरेन्सिक संगणक विश्लेषण हा सायबर गुन्ह्यांसह कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या क्षेत्रासह कार्यरत असतो. संगणक प्रणाली विश्लेषक हा संगणक प्रणाली सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण आहे तो प्रोग्रॅमिंग मध्ये माहीर असतो. मालवेअर विश्लेषक हा सायबर धोके शोधून त्यांचे विश्लेषण करण्यात तज्ञ म्हणून गणला जातो. माहिती सुरक्षा विश्लेषक हा संरक्षण करण्यासाठी सुरक्षा उपाय योजनांवर कार्य करून त्यांची अंमलबजावणी करतो.

या क्षेत्रात अनेक वेळा डिजिटल फॉरेन्सिक सॉफ्टवेअर वापरली जातात यामध्ये क्युरडार, ईम्पेरव्हा हल्ला विश्लेषक, आयबीएम सुरक्षा, मॅग्नेट फॉरेन्सिक्स, एक्स्ट्राहॉप, पॉप्ट सुरक्षा ओएस, एफटीके फॉरेन्सिक टूलकिट, एनकेस फॉरेन्सिक यांचा समावेश होतो अशासारख्या सॉफ्टवेअर वापराची कौशल्ये या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक आहेत.

संभाव्य पुराव्याची ओळख, त्या पुराव्याचे संपादन, पुराव्याचे विश्लेषण,आणि अहवाल तयार करणे या फॉरेन्सिक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांवर विशिष्ट कौशल्ये प्राप्त व्यक्ती कार्यरत असलेले बहुविध कौशल्यधारक हे या क्षेत्रात यशस्वी होतात.

डिजिटल फॉरेन्सिक हे सर्वांत आव्हानात्मक क्षेत्र आहे. यासाठी तुमच्याकडे ठोस आणि विविध माहिती तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी तसेच अद्ययावत विकसित कौशल्ये असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले असेल तर नवीन तंत्रज्ञानाच्या ट्रेंडशी सातत्याने अद्ययावत राहणे ही गरजेचे आहे. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पुरावा म्हणून संकलित केलेल्या डिजिटल डेटाची तपासणी करणे ही या क्षेत्रातील अन्वेषकांची मोठी जबाबदारी असते. सायबर गुन्हे सातत्याने वाढत आहेत त्यामुळेच डिजिटल फॉरेन्सिक क्षेत्रातील तंत्रज्ञांची मागणी मोठ्या प्रमाणावर आवश्यक होते आहे‌.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com