डिजिटल स्किल : उपयोगसिद्ध फिनटेक

फायनान्शियल टेक्नॉलॉजी (फिनटेक) या आंतरशाखीय विकसित आणि दैनंदिन उपयोगित क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
Fintech
FintechSakal
Summary

फायनान्शियल टेक्नॉलॉजी (फिनटेक) या आंतरशाखीय विकसित आणि दैनंदिन उपयोगित क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

फायनान्शियल टेक्नॉलॉजी (फिनटेक) या आंतरशाखीय विकसित आणि दैनंदिन उपयोगित क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. वित्तीय तंत्रज्ञान (फिनटेक) हे असे तंत्रज्ञान आहे ज्याचे उद्दिष्ट आर्थिक व तत्सम सेवांच्या वितरणामध्ये पारंपारिक आर्थिक पद्धतींशी स्पर्धा करून अनेक नवनवीन सुविधा देते. अत्याधुनिक फिनटेक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि बिग डेटा हे फिनटेकचे मूलभूत भविष्यवेधी पूरक प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जातात. फायनान्शियल टेक्नॉलॉजी ही सॉफ्टवेअर, मोबाईल अॅप्लिकेशन्स आणि इतर तंत्रज्ञानाचा संदर्भ देणारी एक सुविधा आहे जी व्यवसाय आणि ग्राहकांसाठी अनेक वित्त प्रकारांमध्ये सुधारणा आणि स्वयंचलित करण्यासाठी तयार विशिष्ट आर्थिक कार्यांसाठी केली जाते.

फिनटेक ही वित्तीय सेवांमध्ये तंत्रज्ञान सक्षम नवकल्पनांचा वापर करते. हा तांत्रिक आमूलाग्र बदल आर्थिक क्षेत्र आणि व्यापक अर्थव्यवस्थेत विविध बदल घडवून आणत आहे, ज्यामुळे आपल्या कामाच्या सर्व पैलूंवर परिणाम होत आहे. याचे स्वरूप देयकांपासून ते आर्थिक धोरण आणि आर्थिक नियमनासाठी सर्व स्तरांवर विकसित झाले आहे.

मोबाईल पेमेंट, ई विमा, क्राऊड फंडिंग, क्रिप्टो करन्सी, ई लोन डिस्बर्समेंट, ई बँकिंग, स्टॉक ई ट्रेडिंग, आदी अनेक सुविधा या फिनटेकने डिजिटल माध्यमाद्वारे दैनंदिन उपयोगात आणलेल्या आहेत. आपल्यापैकी बरेच जण गुगल पे, पेटीएम किंवा मोबाईल पेमेंटचे इतर अनेक प्रकार वापरतात. दैनंदिन आर्थिक व्यवहारात सर्वसामान्यांमध्ये डिजिटल पेमेंट ही सुविधा लोकप्रिय होत असल्याने त्याची उपयोगिताही सिद्ध झाली आहे.

फिनटेक हे क्षेत्र डिजिटल पेमेंट्समध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. कॉन्टॅक्टलेस पेमेंट तंत्रज्ञानाने रोखीने करावयाच्या आर्थिक व्यवहाराची परिभाषाच बदलून टाकली आहे. डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांची वाढणारी संख्या या क्षेत्रात अनेक नवीन अद्ययावत तंत्रज्ञानासाठी नवसंधी निर्माण करते आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत जे तुमचे पैसे आपोआप चांगल्या प्रकारे गुंतवतात, अनेकदा कमी खर्चात, आणि सामान्य व्यक्तींसाठी अनेक वेळा, दक्षता घेऊन वापरयोग्य असतात. अनेक ‘गुंतवणूक अॅप्स’ तुमच्या मोबाईल डिव्हाइसवरून स्टॉक्स, ईटिएफ आदी खरेदी आणि विक्री करणे सोपे करतात. अनेक आर्थिक व्यवहारांसाठी पेटीएम, जीपे आदी अनेक पेमेंट अॅप्स व्यक्ती किंवा व्यवसायांना ऑनलाइन आणि झटपट पैसे देणे सोपे करण्याची सुविधा देतात. विविध वैयक्तिक फायनान्स अॅप्स तुम्हाला तुमचे सर्व वित्त एकाच ठिकाणी पाहू देतात, बजेट सेट करून देऊ शकतात तसेच बिले भरणे सुविधा देतात.

अनेक बँकांची ॲप्स तसेच विविध पीटुपी कर्ज देणारे प्लॅटफॉर्म हे व्यक्ती आणि लहान व्यवसाय मालकांना थेट मायक्रोलोनचे योगदान देणाऱ्या व्यक्तींकडून कर्ज मिळविण्यासाठी ची सुविधा देतात यामुळेच वित्तीय सुविधांचे डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणात झालेले आहे.

ऑपरेशन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ग्राहक अनुभव, सायबर सुरक्षा आणि निधी उभारणी ही फिनटेकची प्रमुख कौशल्य आधारित उपक्षेत्रे आहेत. सुरक्षित डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी मूलभूत आणि प्राथमिक सायबर सेक्युरिटी स्किल्ससह डिजिटल तंत्रज्ञान वापराची जागरूकता आणि सतर्कताही अत्यावश्यक आहे.

अनेक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांची स्वतःची कस्टमाईज्ड फिनटेक उत्पादने बाजारात आणली असून या उत्पादनांच्या प्रक्रियेमध्ये या आंतरशाखीय कौशल्यामधील अनेक तंत्रज्ञांची तसेच पूरक कौशल्य धारकांची आवश्यकता ही सातत्याने वाढतेच आहे.

२०२२ च्या अखेरीस जागतिक स्तरावर उद्योग ३०० डॉलर अब्जपेक्षा जास्त होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळेच या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी विविध कौशल्यांसाठी सहजपणे उपलब्ध होत आहेत. फिनटेकचा वापर आता मनी ट्रान्सफर, ऑनलाइन बँकिंग आणि गुंतवणूक व्यवस्थापनासह विविध वित्त क्रियाकलापांसाठी केला जाऊ शकतो त्यामुळेच या क्षेत्रात अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com