डिजिटल स्किल : कार्यशील एंटरप्राइझ डिझाइन थिंकिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Functional Enterprise Design Thinking

एंटरप्राइझ डिझाइन थिंकिंग ही नावीन्यपूर्ण आणि ब्रँड भिन्नतेसाठी शक्तिशाली कार्यशील विचारधारा आहे.

डिजिटल स्किल : कार्यशील एंटरप्राइझ डिझाइन थिंकिंग

एंटरप्राइझ डिझाइन थिंकिंग ही नावीन्यपूर्ण आणि ब्रँड भिन्नतेसाठी शक्तिशाली कार्यशील विचारधारा आहे. ती आपल्या उद्योग व्यवसायाच्या ग्राहकांना आनंद देऊन अनुभव संपन्नता तयार करण्यावर केंद्रित करते. उद्योग व्यवसायांचा ग्राहक परीघ वाढवणाऱ्या ऑनलाइन अस्तित्वामुळे युजर एक्सपिरियन्स डिझाइनला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. त्यामुळेच या शाखेतील अनेक कौशल्यांचा विचार नवनवीन संधी घेऊन येत आहे. एंटरप्राइझ डिझाइन थिंकिंग पारंपारिक पद्धतींमध्ये हिल्स, प्लेबॅक आणि प्रायोजक वापरकर्ते या तीन मुख्य पद्धतींना जोडून ठेवते.

एंटरप्राइझ डिझाइन थिंकिंग आर्किटेक्चर मॉडेलमध्ये ऑर्गनायझेशनल आर्किटेक्चर, बिझनेस आर्किटेक्चर, इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर, ॲप्लिकेशन आर्किटेक्चर आणि टेक्नॉलॉजिकल आर्किटेक्चर ही पाच आर्किटेक्चरल डिझाइन कौशल्ये समाविष्ट आहेत. एंटरप्राइझ डिझाइन थिंकिंग ही कार्यशील प्रक्रिया आधुनिक एंटरप्राइझच्या वापरकर्त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे एक फ्रेमवर्क आहे. यामध्ये वापरकर्त्यांच्या गरजा प्रथम ठेवून यामध्ये वापरकर्ते कोण आहेत, त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यांचे अनुभव कसे सुधारले जाऊ शकतात हे परिभाषित करणारी प्रक्रिया विकसित करून वापरकर्त्यांच्या जाणीवा समृद्ध करते.

माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय आणि ग्राहक यांच्यासाठी या प्रक्रियेत स्क्रम, लुसिडचार्ट आदी टुल्सचा काही वेळा प्रभावीपणे वापर केला जातो. व्यवसाय प्रकल्प व्यवस्थापनासाठी अनेक वेळा स्क्रम मास्टर हा उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा आणि सुव्यवस्थित करण्यात मदत करतो. विविध कार्यसंघ सदस्य किंवा सहयोगी असे सर्वोत्कृष्ट स्क्रम संघ स्वयं-संघटित असतात आणि त्यामुळे टॉप डाऊन व्यावसायिक व्यवस्थापनावर चांगली पकड राहते. स्केच, वायरफ्रेमिंग, अॅडोब एक्सपी, युएक्स पिन, मारव्हल, झेपलिन, फिग्मा, ओरिगामी स्टुडिओ, ईनव्हिजन स्टुडिओ ही वापरकर्ता अनुभव डिझाइनसाठी विविध साधने सध्याच्या काळात कौशल्ये वृद्धीसाठी आवश्यक आहेत.

एंटरप्राइझ डिझाइन थिंकिंगमध्ये, तुमचे प्रायोजक वापरकर्ते हे असे लोक असतात जे वापरकर्ता कार्यशील गटातून निवडले जातात. या प्रायोजक वापरकर्त्यांसोबत काम करून, तुमचा कार्यसंघ हा तुमच्या वास्तविक अंतिम वापरकर्त्यासाठी आणि लक्षित प्रेक्षकांसाठी उत्पादने आणि अनुभव अधिक यशस्वीपणे डिझाइन करू शकतो यामुळेच या शाखेत अनुभवाधारित कौशल्यवृध्दीस अनन्यसाधारण महत्त्व आहे.

एंटरप्राइझ वापरकर्ता अनुभव डिझायनर असे सॉफ्टवेअर तयार करू शकतात. ते कर्मचाऱ्यांना त्यांची उद्दिष्टे आणि आवश्यकता जाणून घेण्यास मदत करतात, ज्यामुळे ती उद्दिष्टे सहज साध्य होतात आणि कर्मचारी, त्यांचे व्यवस्थापक, त्यांचे व्यावसायिक भागीदार आणि ग्राहक यांच्यातील संवाद सुधारू शकतो. आयबीएम विकसित एंटरप्राइझ डिझाइन थिंकिंग ही मूलभूत प्रथम फ्रेमवर्क संकल्पना विशेषत: व्यवसाय स्तरीय प्रकल्प आणणाऱ्या मर्यादा व व्याप्तींची पूर्तता करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. हे फ्रेमवर्क विविध, विखुरलेल्या संघांना जटिल समस्या व प्रकल्पांवर अशा प्रकारे सहयोग करण्यास मदत करते जे वापरकर्त्याच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करून उत्कृष्ट निकाल देते.

एंटरप्राइझ डिझाइन कार्यशील विचारधारा ही उद्योग प्रवीणता हा उद्देश साध्य करण्यासाठी सुसंगत ओळख, अनुभव आणि तंत्रज्ञान आर्किटेक्चरद्वारे एंटरप्राइजेस उभारणी करण्याचा सातत्य सराव आहे. त्याद्वारे स्टार्टअपमध्ये नवक्रांती निर्माण होत असून अनेक संधी उपलब्ध करत आहे.