डिजिटल स्किल : थिंक विथ गुगल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

think with google

ऑनलाइन जगताच्या बाजारपेठेतील उत्पादन, विशिष्ट मुद्दे, कौशल्ये आदींच्या मतप्रवाहांची अचूक ओळख करून देणे तसेच भविष्यातील प्रवाहांचे आकलन करून देणे हेही या प्लॅटफॉर्मचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

डिजिटल स्किल : थिंक विथ गुगल

ऑनलाइन जगतातील विशिष्ट कार्यसिद्धीसाठी गुगल सहविचार (थिंक विथ गुगल) हा प्लॅटफॉर्म अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वत-ची अशी एक वैचारिक बैठक असते दैनंदिन अनेक कार्यात तसेच निर्णय प्रक्रियेमध्ये याच वैचारिक बैठकीचे प्रतिबिंब दिसते. बहुतेकवेळा कार्यपद्धतींच्या पूर्ततेसाठी आपण माहिती आधारावरील विशिष्ट पद्धतीची टूल्स वापरतो. ‘थिंक विथ गुगल’मध्ये अशा प्रकारची अनेक टूल्स उपलब्ध असून ती वापराची कौशल्ये आधुनिक कार्यसंपन्नतेसाठी प्राप्त करणे अत्यावश्यक आहे.

ऑनलाइन जगताच्या बाजारपेठेतील उत्पादन, विशिष्ट मुद्दे, कौशल्ये आदींच्या मतप्रवाहांची अचूक ओळख करून देणे तसेच भविष्यातील प्रवाहांचे आकलन करून देणे हेही या प्लॅटफॉर्मचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. गुगल ट्रेंड, मार्केट फाइंडर आणि रिच मीडिया गॅलरी ही तीन थिंक विथ गुगलच्या (गुगल सहविचार) मुख्य कौशल्यवाढीची साधने आहेत. यांचा प्रभावीपणे वापर करून ‘ट्रेन्ड सेटिंग’ प्रस्थापित करणाऱ्या कौशल्याधारकांना आज अनेक संधी उपलब्ध आहेत.

ग्राहक अंतर्दृष्टी ही ग्राहकांच्या आजपर्यंतच्या प्रवासाद्वारे तसेच ग्राहक रुढींद्वारे ट्रेंड सेट करून प्रगतिपथावर मार्गक्रमण करण्यासाठी या टूल्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येतो आहे. ऑनलाइन बाजारपेठ वृद्धी धोरणामध्ये (मार्केटिंग स्टॅटेजी) मोबाईल, ॲप, ऑटोमेशन, इंडस्ट्री, युट्युब, सर्च आदी टूल्सचा समावेश केला गेला आहे.

भविष्यातील बाजारपेठ वृद्धीसाठी क्रिएटिव्हिटी, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, मॅनेजमेंट कल्चर, ट्रस्ट आणि प्रायव्हसी यांचा विचार प्राधान्याने ‘थिंक विथ गुगल’मध्ये केला गेला आहे.

‘थिंक विथ गुगल’ हा मार्ग आपल्यासोबत सर्व गोष्टी शेअर करतो आणि ग्राहकांच्या अंतर्दृष्टीपासून ते उपयुक्त साधनांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला सक्षम स्रोत देतो. येथे आपल्याला आपण शोधत असलेला डेटा आणि ट्रेंड, अग्रेषित दृष्टिकोन आणि मार्केटिंग धोरणांना प्रेरणा देण्यासाठी मोहिमा पार पाडणारे पडद्यामागचे दृश्य सहजपणे दिसू शकते.

‘थिंक विथ गुगल’ हे वापरकर्त्यांचे वय, लिंग, वैवाहिक स्थिती, उत्पन्न आणि वैयक्तिक स्वारस्ये यांचा अंदाज लावते. टूल वापरणे हे दर्शविते की बरेचसे अंदाज अचूक आहेत. यामुळेच अशावेळी गुगलला तुमची माहिती ट्रॅक करण्यापासून किंवा तुमचे प्रोफाइल पुढे जाण्याचा अंदाज लावण्यापासून ते थांबवण्या पर्यंतच्या सर्व प्रक्रिया करणे देखील सहज शक्य आहे.

डिजिटल इनोव्हेशनने मार्केटिंग उद्योगाला मनमोहक वेगाने पुढे नेणे सुरू ठेवले आहे. मार्केटिअर (विपणक) म्हणून, आपण माहिती आणि प्रेरित राहण्यासाठी डेटा, विश्लेषण आणि अंतर्दृष्टी द्वारे सर्व काही ‘थिंक विथ गुगल’च्या माध्यमातून करू शकतो. गुगल अॅडसह होणारे विविध प्रयोग, हजारो-लाखो वापरकर्त्यांनी गुगल सर्चवर घेतलेले शोधन व त्यातून होणाऱ्या माहितीच्या स्रोतांचे विश्लेषण व स्पष्ट होणारे प्रवाह या साऱ्या गोष्टींचा विचार गुगलसह करण्याची सुविधा या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला मिळते.

गुगल ट्रेंड्समध्ये गुगल सर्च इंजिनला केलेल्या वास्तविक शोधन विनंत्यांच्या मोठ्या प्रमाणात फिल्टर न केलेल्या नमुन्यात प्रवेशास अनुमती देते. यामध्ये निनावी आणि वर्गीकृत शोधासाठी विषय निर्धारित आणि एकत्रित केले जातात. गुगल ट्रेंड्स हे मार्केटिंग करणाऱ्यांसाठी चांगले साधन आहे. समविचारी, भिन्नविचारी आणि सहविचारी अशा सर्व स्तरातील व्यक्ती आणि व्यक्तीसमूहांशी सुसंवादीपणे ‘थिंक विथ गुगलचा’ उपयोग सातत्याने अनेक कार्यात मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे.

ऑनलाइन जगताच्या मार्केटचा आपल्या विचार प्रवाहाशी, कार्यपद्धतीशी, उत्पादनाशी शोध घेऊन प्रस्थापित होण्यासाठी ‘थिंक विथ गुगलच्या’ अनेक टूल्सचा कौशल्यपूर्ण वापर हा भौगोलिक मर्यादांच्या ओलांडून पलिकडे जाण्यासाठीचा अत्यंत सुकर, यशस्वी आणि समृद्धदायी मार्ग आपल्याला उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :educationjobGoogledigital