esakal | विशेष : यंत्र अभियंता आणि ऑटोमेशन
sakal

बोलून बातमी शोधा

Engineer Automation

विशेष : यंत्र अभियंता आणि ऑटोमेशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यंत्र अभियंता यंत्रांनी वेढलेला, तेल आणि वंगण यांच्या सानिध्यात हात काळे करणारा, निळे बाह्यवस्त्र घातलेला अशी प्रतिमा आता कालबाह्य होत आहे. कारखान्यातील यंत्रे अद्ययावत आणि स्वयंचलित होत गेली, त्याचगतीने यंत्र अभियंत्याच्या कामाची परिभाषाही बदलली. हे परिवर्तन घडले ते साधारणपणे वर्ष २०००नंतर कारखान्यातील सर्वच क्षेत्रात संगणकाचा वाढत्या वापराने आणि उपलब्ध झालेल्या संगणक आज्ञावलींनी. हळूहळू उत्पादांचे प्रारूप, रचना, विश्लेषण आणि संश्लेषण, सदृशीकरण, प्रक्रिया नियोजन, परीक्षण आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व अभियांत्रिकी कार्यपद्धती संगणक आधारित होत गेल्या आणि यंत्र अभियांत्रिकीचे स्वरूप बदलत गेले. ह्या बदलांचा फायदा उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविण्यास झाला. या बदलांमुळे यंत्र अभियांत्रिकीमधील संगणक आज्ञावलींचे ज्ञान आणि कौशल्य असलेल्या निपुण मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे.

गरज संगणक अज्ञावलींची

संगणक आधारित रचना, निर्मिती आणि अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवीतून ही कौशल्ये आणि निपुणता मिळविता येते. संगणक आज्ञावलींची निर्मिती आणि संगणक आज्ञावलींची उपयुक्तता या दोन रचनेत हा अभ्यासक्रम शिकविला जातो. यात प्रामुख्याने कॉम्पुटर एडेड डिझाईन, कॉम्पुटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग, कॉम्पुटर एडेड इंजिनिअरिंग, कस्टमायझेशन ऑफ सॉफ्टवेअर्स, कॉम्पुटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग, मॉडेलिंग अँड सिम्युलेशन, फायनाईट एलिमेंट ॲनालिसिस, कॉम्पुटेशनल फ्लुइड डायनॅमिकस, वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंग, ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेटेड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टिम मॉडेलिंग, मटेरियल टेक्नॉलॉजी, बायो-मेकॅनिक्स, प्रॉडक्ट डिझाईन अँड प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनेजमेंट, डेटा ॲनालिसिस, सप्लाय चेन मॅनेजमेंट, रोबोटिक्स, मॅनेजमेंट ऑफ टेक्नॉलॉजी या विषयांचा समावेश होतो. त्याच बरोबर शोधप्रबंध ही सादर करावयाचा असतो.

या संगणक आज्ञावली शिका...

ऑटोकॅड, सॉलिडवर्क्स, सॉलिडएज, मास्टरकॅम, एजकॅम, कटिया, इन्व्हेन्टर प्रोफेशनल, अँसिस, अल्टेर, थ्रीडीएक्सपेरियन्स, सिमूफॅक्ट, युनीग्राफिक्स, टीमसेंटर, एलएस-डायना.

- प्रा. डॉ. गणेश काकांडीकर

loading image