टेक करिअर : डिझाईन थिंकिंग : नवसंकल्पनांची विचारपद्धती

कुठल्याही समस्येचे चांगले समाधान शोधायचे झाल्यास, समस्या आधी नीटपणे समजून घ्यावी लागते आणि त्यासाठी डिझाईन संघाला स्वतःलाच योग्य प्रश्ने विचारावी लागतात.
design thinking
design thinkingsakal
Summary

कुठल्याही समस्येचे चांगले समाधान शोधायचे झाल्यास, समस्या आधी नीटपणे समजून घ्यावी लागते आणि त्यासाठी डिझाईन संघाला स्वतःलाच योग्य प्रश्ने विचारावी लागतात.

- प्रा. डॉ. गणेश काकांडीकर

अभियांत्रिकीचा उगमच मुळात समस्या सोडविण्यासाठी झाला आहे. औद्योगिक क्रांतीच्या पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात उत्पादकांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे वस्तूंची (प्रॉडक्ट) निर्मिती केली, ह्यात बाजारपेठांचा कुठलाही अंदाज घेतला जात नव्हता. १९९०च्या दशकात जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग हे एकच बाजारपेठ झाली. ह्यामुळे स्थित्यंतर झाले आणि उत्पादकांची बाजारपेठ आता ग्राहकांची बाजारपेठ म्हणून उदयास आली. बदलल्या काळाप्रमाणे ग्राहकांच्या अभिव्यक्तीची बदलत गेल्या.

डिझाईन थिंकिंग ही अत्यंत क्लिष्ट अशा समस्या, वापरकर्त्याच्या परिवेशात, सोडविण्याची विचारधारा आणि प्रक्रिया आहे. ही पुनरावृत्ती प्रक्रिया असून, ज्यात ग्राहकांच्या अभिरुचीचे आकलन करून, समस्यांची व्याख्या निश्चित केली जाते, गृहितकांना आव्हान दिले जाते आणि त्यावरून अभिनव, नावीन्यपूर्ण उत्पादांची निर्मिती केली जाते, जेणेकरून ग्राहकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळेल. डिझाईन थिंकिंगमधून एकाच समस्येसाठी अनेक पर्यायी उत्तरे आणि कृतियोजना शोधल्या जातात, जे की अगदी प्राथमिक विश्लेषणातून शक्य नाही. डिझाईन थिंकिंग हे तुमच्या ग्राहकांना अत्यंत तपशिलात जाऊन समजून घेण्यासाठी मदत करते, कारण सर्व सेवा आणि उत्पात ग्राहकांसाठी निर्माण केल्या जातात. समस्या व उत्तरे, गृहीतके आणि त्यांचे गृहितार्थ किंवा गर्भितार्थ यांना प्रश्नांच्या संदर्भाने अभ्यासले जाते.

कुठल्याही समस्येचे चांगले समाधान शोधायचे झाल्यास, समस्या आधी नीटपणे समजून घ्यावी लागते आणि त्यासाठी डिझाईन संघाला स्वतःलाच योग्य प्रश्ने विचारावी लागतात. प्रश्नांची योग्य रचना करणे हे सुद्धा एक कौशल्य आहे, कारण चुकीच्या प्रश्नातून अर्धवट माहिती जमा होते, ज्यामुळे आपण सगळ्यात योग्य असे समस्येचे निराकरण करू शकत नाही. काही वेळा समस्यांच्या संज्ञा संदिग्ध असतात. म्हणूनच डिझाईन थिंकिंगला अभिनव, रचनात्मक, सर्जनशील, निर्मितीक्षम अशी समस्यांचे निराकरण करणारी पद्धती म्हणून ओळखले जाते. डिझाईन थिंकिंग अगोदरच्या उत्तरापेक्षा थोडेसे वाढीव उत्तर शोधण्याऐवजी क्रांतिकारक उत्तरे शोधण्याचा दृष्टिकोन ठेवते. स्पृहणीयता, अंकुरणक्षमता आणि व्यवहार्यता ह्यातूनच संरचना प्रणालीची सुरुवात होते. डिझाईन थिंकिंग आता फक्त अभियांत्रिकीपुरती मर्यादित न ठेवता कुठल्याही क्षेत्रासाठी अवलंबिता येते. डिझाईन थिंकिंग संपून प्रक्रिया पाच टप्प्यांमध्ये विभागली आहे.

1) भावनारोपित निरीक्षण : पहिल्या टप्प्यात अभिकल्पक हा ग्राहकांचे अतिशय सूक्ष्मपणे निरीक्षण करतो आणि त्यांच्या उत्पादाबद्दलच्या भावना टिपून घेतो. उत्पादनासोबत त्यांचा व्यवहार किंवा उत्पादनाचा त्यांच्यावरचा परिणाम नोंदला जातो. उदा : एक शालेय विद्यार्थी आणि एक व्यावसायिक, या दोघांच्या शिफर पेनबद्दलच्या भावना आणि त्याची हाताळणी अतिशय भिन्न असेल, पण पेन हा दोघांसाठी बनविलेला आहे. ही निरीक्षणे निःस्पृहपणे आणि ग्राहकांच्या आवडी-निवडीचे पूर्वगृहितके बाजूला ठेवून नोंदविले जातात. बऱ्याचवेळा ग्राहकांना त्यांचे विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत, जसे की तांत्रिक बाबी आणि त्यांच्या व्याख्या, ह्या रचनाकाराकडून टिपल्या जातात.

2) व्याख्या : पहिल्या टप्प्यातील निरीक्षणापासून समस्येची योग्य मांडणी करून व्याख्या करण्यात येते. समस्येची व्याख्या समर्पक असली पाहिजे, ज्यातून ग्राहकांच्या सर्व चिंतांचे आकलन झाले पाहिजे. ग्राहक उत्पात वापरताना अडचणींचा कशा प्रकारे सामना करतात ह्याची नोंदही व्याख्येत असली पाहिजे.

3) संकल्पना : तिसऱ्या टप्प्यात समस्यांच्या निराकारणांच्या वेगवेगळ्या पर्यायी कल्पना मांडल्या जातात. मेंदू मंथन करून संघ भावनेतून सर्वांच्या सहयोगातून या पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. ह्या टप्प्याच्या शेवटी काही संकल्पना निवडली जातात ज्यांच्यावर पुढच्या टप्प्यात काम करता येईल.

4) प्रतिकृती : मागच्या टप्प्यात निवडलेल्या संकल्पनांच्या प्रतिकृती ह्या टप्प्यात तयार केल्या जातात जेणेकरून उत्पादनांचे/वस्तूंचे आकार, वजन आणि स्वरूप समजण्यास मदत होते. ह्या प्रतिकृती बहुधा आकाराने लहान श्रेणीत अशा असतात. संकल्पनेतील उत्पात निर्माण केल्यावर कसे दिसतात हे पहिल्यांदा याच टप्प्यात प्रकट होते. आता प्रतिकृती निर्माणासाठी त्रिमिती मुद्रणाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.

5) परीक्षण : या टप्प्यात प्रतिकृतींचे वेगवेगळे परीक्षण केले जातात. पहिल्यांदा उत्पात बघितल्यावर ग्राहक कसे प्रतिक्रिया वा प्रतिसाद देतात ह्याचेही परीक्षण केले जाते. ही प्रक्रिया पुनः प्रत्ययकारी असल्याने अनेकदा पाचव्या टप्प्यापासून पुन्हा पहिल्या टप्प्यावर जाऊन पुन्हा अनुक्रमाने सगळे टप्पे पार केले जातात.

डिझाईन थिंकिंग प्रक्रिया प्रामुख्याने कर्मचाऱ्यांना नवसंकल्पना मांडण्याची आणि समस्यांचे निराकरण करण्याची संधी देते. १९६९मध्ये हेरबर्ट सिमोन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञाने लिहिलेल्या एका लेखातून डिझाईन थिंकिंगचा पाय रचला गेला. त्यांनी अकृत्रिमांचे विज्ञान या लेखातून सात टप्प्यातून संकल्पनेचा समस्यांचे निराकरण यासाठी कल्पकतेने वापर कसा होईल याचा ऊहापोह केला आहे. १९७३मध्ये हॉर्स रिटेल या रचनाकाराने क्लिष्ट समस्या असा शब्दप्रयोग केला. डिझाईन थिंकिंगचा हा प्रवास आता सर्वच व्यावसायिक क्षेत्रात ग्राहकांच्या समाधानासाठी प्रामुख्याने होत आहे. शेवटी उद्योगजगात हे ग्राहकांच्या अंगिकारावर अवलंबून आहे.

(लेखक डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठात यंत्र अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com