

Scientific Awaking: The Legacy of Homi Bhabha Young Scientist Exam Since 1981
Sakal
जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
‘असे का?’ याचे उत्तर माहीत नसेल, तर त्या गोष्टीला समस्या म्हणतात. समस्येचे उत्तर जाणून घेणे किंवा समस्येवर उपाय सुचवणे आणि जाणून घेतलेल्या उपायांची अंमलबजावणी करणे. गरजेचे असते. प्रश्न विचारणे, प्रश्नांची उत्तरे शोधणे आणि ज्ञानाला कोणत्याही कक्षेत संकुचित न ठेवता त्याला विकसित करण्याच्या चिकित्सक वृत्तीची भावना जागृत ठेवणे या बाबींमुळे विज्ञाननिष्ठ समाज घडतो. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करून समाजोपयोगी संशोधन होणे, ही काळाची गरज आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचा असा दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी ‘डॉ. होमी भाभा बालवैद्यानिक स्पर्धा परीक्षा’ १९८१ पासून बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळामार्फत आयोजित केली जाते. दरवर्षी ३००० पेक्षा अधिक शाळा यात सहभागी होतात. इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते.