संवाद : सायबर सिक्युरिटीमधील रोजगार

मागील लेखात आपण ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयातील पदवी शिक्षणाचे महत्त्व जाणून घेतले. या विषयातील पदवी शिक्षण पूर्ण केल्यास, या विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या तसेच स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आहेत.
Employment in Cyber Security
Employment in Cyber Securitysakal

- डॉ. माधुरी कुलकर्णी

मागील लेखात आपण ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयातील पदवी शिक्षणाचे महत्त्व जाणून घेतले. या विषयातील पदवी शिक्षण पूर्ण केल्यास, या विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या तसेच स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आहेत. डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया (डीएससीआय)च्या २०२१मधील अंदाजानुसार, २०२५पर्यंत भारताला दहा लाख सायबर सुरक्षा व्यावसायिकांची आवश्यकता असेल.

सायबर सुरक्षेचे क्षेत्र चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचे क्षेत्र म्हणून उदयास आलेले आहे. सायबर सिक्युरिटी या क्षेत्रात जवळपास अडीशेच्यावर वेगवेगळी कार्यक्षेत्र आणि प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये किमान आठ ते दहा वेगवेगळ्या प्रकारची पदे उपलब्ध आहेत.

बीएस्सी इन सायबर अँड डिजिटल सायन्स’ पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून तसेच विविध शॉर्ट सर्टिफिकेशन कोर्सेस पूर्ण केल्यास खालील स्वरूपाच्या पदांसाठी नोकरीची संधी मिळू शकते. या लेखात आपण त्यापैकी काही मोजक्या महत्त्वाच्या नोकरीच्या पदांविषयी माहिती घेऊ.

खालील पदांना सर्वाधिक मागणी आहे आणि त्यांची सर्वाधिक वाढ आणि व्याप्ती आहे

1) सायबर सुरक्षा विश्लेषक (आयटी सिक्युरिटी ॲनालिस्ट)

नेटवर्क निरीक्षण करणे, सुरक्षा उल्लंघनांचा रिपोर्ट बनवणे, सुरक्षा उत्पादने व प्रक्रियांसंबंधी मदत करणे इत्यादी कामे या पदावरील व्यक्ती करतात.

2) नेटवर्क सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर

सायबर सुरक्षा स्तरांची रचना करणे, स्थापना करणे, सुरक्षा धोक्यांसाठी योग्य उपाय योजना करणे व जोखीम कमी करण्यासाठी कारवाई करणे इत्यादी स्वरूपाची कामे या पदांवरील व्यक्ती करतात.

3) इंटरनल आयटी सिक्युरिटी ऑडिटर

सायबर सिक्युरिटी संबंधित पायाभूत सुविधांचे ऑडिट करणे व सुधारणा सुचवणे, सुधारणांची अंमलबजावणी केलेली आहे किंवा नाही याची तपासणी करणे अशा स्वरूपाचे काम या पदावरील व्यक्ती करतात.

4) सायबर सिक्युरिटी ॲडव्हायझर

या स्वरूपाचे काम करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर काम करू शकता. विविध कंपन्या, सरकारी ऑफिसर्स, बँका विशिष्ट प्रोजेक्टसाठी सायबर सुरक्षा सल्लागारांची नेमणूक करतात.

5) सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट

सायबर हल्ल्यांपासून डेटाचे संरक्षण करण्यासाठी उपाय योजना करणे, फायर वॉल, अँटिव्हायरस सॉफ्टवेअरच्या चाचण्या करणे, नवीन सुरक्षा जोखमींचे संशोधन करणे, प्रशिक्षण घेणे अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या हे तज्ज्ञ पार पाडतात.

6) चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर/आर्किटेक्ट

या पदावरील व्यक्ती पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी जबाबदार असतात.

7) एथिकल हॅकर

या पदावरील व्यक्ती सायबर सुरक्षेतील कमकुवतपणा शोधण्याचे काम करतात. शिवाय घटना हाताळताना तांत्रिक साहाय्य प्रदान करतात.

याशिवाय डिजिटल फॉरेन्सिक एक्झामिनर, चिप्स सिक्युरिटी मॅनेजर, मालवेअर ॲनालिस्ट, क्लाऊड सिक्युरिटी स्पेशालिस्ट इत्यादी आणि इतर अनेक प्रकारच्या पदांवर सायबर तज्ज्ञ काम करून उत्तम करिअर करू शकतात.

वर नमूद केलेल्या महत्त्वाच्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील पदांसाठी नोकरी मिळवण्याकरिता शॉर्ट सर्टिफिकेशन कोर्सेस पूर्ण करणे महत्त्वाचे ठरते.

उदाहरणार्थ दाखल प्रमाणित नैतिक हॅकर (सीईएच), प्रमाणित माहिती सुरक्षा ऑडिटर (सीआयएसए), प्रमाणित माहिती प्रणाली सुरक्षा आर्किटेक्चर व्यावसायिक (सीआयएसएसपी-आयएसएसएपी), माहिती प्रणाली सुरक्षा व्यवस्थापन व्यावसायिक (सीआयएसएसपी-आयएसएसएमपी) आदी सर्वाधिक मागणी असलेली प्रमाणपत्रे आहेत.

(लेखिका बी. डी कर्वे कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स, पुणे येथे प्राचार्या आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com