संवाद : ‘सायबर सुरक्षा’ तज्ज्ञ होण्यासाठी...

सायबर सुरक्षा आणि सायबर हल्ले याविषयी मागच्या दोन लेखात आपण जाणून घेतलं. या लेखातून आपण या विषयातील शिक्षणाच्या उपयुक्ततेबद्दल जाणून घेऊ.
Cyber Security
Cyber SecuritySakal

- डॉ. माधुरी कुलकर्णी

सायबर सुरक्षा आणि सायबर हल्ले याविषयी मागच्या दोन लेखात आपण जाणून घेतलं. या लेखातून आपण या विषयातील शिक्षणाच्या उपयुक्ततेबद्दल जाणून घेऊ. सायबर सिक्युरिटी हे क्षेत्र प्रचंड वेगानं वाढत आहे. यु.एस.ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या अंदाजाप्रमाणे २०२१ ते २०३१ या कालावधीत या क्षेत्राची तब्बल ३५ टक्क्यांनी वाढ होईल.

याचाच अर्थ असा की, बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी या विषयात शिक्षण घेतल्यास भविष्यात काही वर्षात नोकरीच्या उत्तम संधी त्यांना आहेत. आर्थिक अनिश्चिततेच्या काळातही सायबर सिक्युरिटी व्यावसायिकांच्या नोकऱ्या सुरक्षित राहण्याची शक्यता खूपच जास्त आहे.

सायबर सुरक्षा हे माहिती तंत्रज्ञानाचीच एक शाखा आहे. व त्यामुळे ‘इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी’मधला हा एक वेगळा, प्रगत आणि आकर्षक करिअरचा पर्याय आहे. यामुळेच अनेक विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करू लागले आहेत.

आवश्यक कौशल्ये

उत्कृष्ट सायबर सुरक्षा व्यावसायिक होण्यासाठी तांत्रिक कल, संवाद कौशल्य, समस्या सोडवण्यासाठी लागणारे कौशल्य, विशेषणात्मक कौशल्य, सर्जनशीलता, संयम आणि पद्धतशीर दृष्टिकोन तसेच नावीन्यपूर्ण उपाय योजण्यास सक्षम असणे उपयोगाचे आहे. ही कौशल्ये या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना विकसित करता येतात.

बारावी पास विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर सिक्युरिटी’मध्ये पदवी अभ्यासक्रम -

सायबर सुरक्षा विषयात लहान लहान कालावधीचे अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध असतात. परंतु या विषयात पदवी शिक्षण घेतले तर सखोल ज्ञान प्राप्त होते व त्यामुळे उच्च पदाच्या व उत्तम पगाराच्या नोकरीच्या संधींचे दालन उघडते. व म्हणूनच सायबर आणि डिजिटल सायन्स या विषयात बॅचलर ऑफ सायन्स (B.sc) हा पदवी अभ्यासक्रम उत्तम आहे.

कोणत्याही शाखेचा म्हणजेच आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स मधून बारावी पास झालेले विद्यार्थी/ विद्यार्थिनी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. तसेच तीन वर्षाचा तंत्रशिक्षण बोर्डाचा डिप्लोमा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, विद्यार्थिनी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.

अभ्यासक्रमात काय शिकाल?

या कोर्समध्ये सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल सायन्स याचा उत्तम समन्वय असल्यामुळे नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने या कोर्सची उपयुक्तता खूप जास्त आहे. या अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा संकल्पना, नेटवर्क सुरक्षा, क्रिप्टोग्राफी, डिजिटल फॉरेन्सिक, मालवेअर विश्लेषण, सायबर लॉ, एथिकल हॅकिंग, क्लाऊड सिक्युरिटी, ऑपरेशन सिस्टम्स, डिजिटल कम्युनिकेशन्स, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, बिग डेटा ॲनालिटिक्स इत्यादी विषयांचे सखोल ज्ञान मिळते.

निष्कर्ष

सायबर सुरक्षा तज्ञ बनण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मूलभूत पदवी शिक्षण घेऊन या क्षेत्रातील ज्ञानाचा पाया भक्कम करणे. आणि नंतर जसे जसे नवीन तंत्रज्ञान विकसित होत असते, त्याप्रमाणे वेगवेगळी महत्त्वाची सायबर सुरक्षा प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी कोर्सेस करणे आवश्यक असते. कारण ही प्रमाणपत्रे तुमच्या पदवीचं मूल्य वाढवतात.

सायबर सिक्युरिटी विषयात मिळणाऱ्या नोकरीच्या तसेच स्वयंरोजगाराच्या संधींविषयी पुढील लेखात आपण सविस्तर बोलणार आहोत.

(लेखिका बी.डी. कर्वे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स, पुणे येथे प्राचार्या आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com