हेल्थ केअर : ब्रेन मशिन इंटरफेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brain machine Interface

मेंदूचे हेच सिग्नल मिळवून त्यांचे विश्लेषण करून आणि रुग्णाकडून किंवा निरोगी व्यक्तीकडून इच्छित क्रिया करून घेणाऱ्या तंत्रज्ञानाला ब्रेन मशिन इंटरफेस हे नाव दिले आहे.

हेल्थ केअर : ब्रेन मशिन इंटरफेस

ब्रेन-मशिन किंवा ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस (BCIs), म्हणजेच मानवी मेंदूतील क्रिया मशिनच्या किंवा कॉम्प्युटरच्या साहाय्याने नियंत्रित करणे. आरोग्य क्षेत्रातील हे क्रांतिकारी तंत्रज्ञान येत्या काही वर्षात लाखो तरुणांना नवीन नोकरीच्या आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. हे तंत्रज्ञान सध्या बाल्यावस्थेत असून पुढच्या पाच वर्षात यामधील क्रांतिकारी बदल आपल्याला दृश्य स्वरूपात दिसून येतील. मानवी मेंदू हा शरीरावर नियंत्रण ठेवत असताना शरीरातील अवयवांना आणि पेशींना त्याचे आदेश हे सिग्नलच्या स्वरूपात देत असतो. साधारणपणे हे इलेक्ट्रिक सिग्नलसारखे असतात.

मेंदूचे हेच सिग्नल मिळवून त्यांचे विश्लेषण करून आणि रुग्णाकडून किंवा निरोगी व्यक्तीकडून इच्छित क्रिया करून घेणाऱ्या तंत्रज्ञानाला ब्रेन मशिन इंटरफेस हे नाव दिले आहे. हे तंत्रज्ञान मेंदूच्या सिग्नलचे आणि बाहेरून दिलेल्या आदेशांचे मशिनला समजेल अशा भाषेत भाषांतर करतात आणि पुन्हा त्याचीच भाषा रुग्णाला आणि डॉक्टरांना समजेल अशा भाषेत रूपांतरित करते.

या तंत्रज्ञानाची काही वैशिष्ठ्ये

ब्रेन-मशिन इंटरफेस तंत्रज्ञान हे वेगाने वाढणाऱ्या संशोधन आणि विकास उपक्रमाचे केंद्रबिंदू आहे. ते मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञ, अभियंते, चिकित्सक आणि सर्वसाधारणपणे लोकांसाठी रोमांचक आहे. या तंत्रज्ञानाचे भविष्‍यातील यश ३ महत्‍त्‍वाच्‍या क्षेत्रांमध्‍ये प्रगतीवर अवलंबून असेल.

  • ब्रेन-मशिन इंटरफेससाठी सिग्नल-अधिग्रहण हार्डवेअर आवश्यक आहे. जे सोईस्कर, पोर्टेबल, सुरक्षित आणि सर्व वातावरणात कार्य करण्यास सक्षम असेल. यामध्ये इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंगच्या कौशल्यांची गरज भासेल.

  • ब्रेन-मशिन इंटरफेस प्रणाली गंभीर अपंग लोकांच्या वास्तविक-जगातील वापराच्या दीर्घकालीन अभ्यासामध्ये प्रमाणित करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या व्यापक प्रसारासाठी प्रभावी आणि व्यवहार्य मॉडेल्सची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

  • याचबरोबर वैद्यकीय क्षेत्राकडून या तंत्रज्ञानाला सुरवातीला मिळणार प्रतिसादही महत्त्वाचा ठरेल यावरच या तंत्रज्ञानाचे भविष्य अवलंबून असेल.

सध्या, हे तंत्रज्ञानाची झेप फक्त प्रयोगशाळेतीळ संशोधनापर्यंत मर्यादित आहे. याचबरोबर काही प्रमाणात हे तंत्रज्ञान प्राण्यांवर वापरले जात असून त्याच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क यांनी मानवी मेंदूमध्ये छोटीशी चीप बसवून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे तंत्रज्ञान आम्ही विकसित करत आहोत असे जाहीर केले होते. हे तंत्रज्ञानसुद्धा ब्रेन-मशिन इंटरफेस प्रणालीचाच एका भाग आहे.

ब्रेन-मशिन इंटरफेस प्रणाली तंत्रज्ञान हे सध्या शास्त्रज्ञ, अभियंते, आरोग्य चिकित्सक, डॉक्टर्स, उद्योगपती, शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य लोक, या सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरले आहे.

मुखत्वे करून हे तंत्रज्ञान लोकांच्या सार्वजनिक वैयक्तिक आरोग्य क्षेत्रात खूपच क्रांतिकारक ठरणार आहे, त्यामुळे आरोग्य क्षेत्र या तंत्रज्ञानाकडे डोळे लावून बसले आहे.

मज्जातंतूंच्या विकारांमुळे गंभीरपणे अक्षम झालेल्या लोकांसाठी उपयुक्त कार्य पुनर्स्थित करण्यासाठी किंवा पुनर्संचयित करण्यासाठी हे तंत्रज्ञान नियमितपणे वापरले जाऊ शकते.

स्ट्रोक, डोक्याला दुखापत आणि इतर विकार असलेल्या लोकांसाठी या तंत्रज्ञानामुळे त्यांचे पूर्ववत निरोगी सर्वसामान्य आयुष्य पुन्हा मिळू शकते. याचबरोबर हे तंत्रज्ञान अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस, सेरेब्रल पाल्सी, स्ट्रोक किंवा पाठीच्या कण्याला दुखापत यांसारख्या न्यूरोमस्क्युलर विकारांमुळे अक्षम झालेल्या लोकांसाठी त्यांचे पूर्वीचे उपयुक्त कार्य पुनर्स्थित किंवा पुनर्संचयित करण्यासाठी क्रांतिकारक ठरणार आहे. फक्त रूग्णांसाठीच नाही तर वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांच्या कार्यक्षमतेत सुद्धा वाढ करू शकते.

Web Title: Dr Nanasaheb Thorat Writes Brain Machine Interface

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..