हेल्थ केअर : भविष्यवेधी ‘उपकरण’मात्रा

दुर्दैवाने फिजिक्सला मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात फारच दुय्यम स्थान दिले आहे किंवा भारतामध्ये तर हा विषयच दुर्लक्षित झाला आहे.
हेल्थ केअर : भविष्यवेधी ‘उपकरण’मात्रा
Summary

दुर्दैवाने फिजिक्सला मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात फारच दुय्यम स्थान दिले आहे किंवा भारतामध्ये तर हा विषयच दुर्लक्षित झाला आहे.

डॉक्टरांच्या गळ्यात रुग्णाच्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी अडकवलेला स्टेथोस्कोप ते रुग्णाच्या संपूर्ण शरीरामधील असणारे अनेक बिघाड शोधणारे कोट्यवधी रुपयांचे एमआरआय मशीन, मेडिकल क्षेत्रातील सर्वच क्रांतिकारक उपकरणे ही फिजिक्स (भौतिकशास्त्र) संशोधकांनी शोधली आहेत. तरीसुद्धा दुर्दैवाने फिजिक्सला मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात फारच दुय्यम स्थान दिले आहे किंवा भारतामध्ये तर हा विषयच दुर्लक्षित झाला आहे. काही वर्षांत हा विषय इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमातून गायबच होईल अशी चिन्हे दिसत आहेत. याउलट कोव्हिडनंतर या विषयाला आणि या विषयातील संशोधनाला मेडिकल क्षेत्राच्या विकासासाठी खूपच मोठे अवकाश तयार झाले आहे. तरुण विद्यार्थ्यांना जर मेडिकल क्षेत्रात यायचे असेल आणि त्यांना डॉक्टर किंवा फार्मासिस्ट होता येत नसेल, तर मेडिकल फिजिसिस्ट होऊन डॉक्टरांएवढेच पॅकेज मिळवण्याची संधी आहे. जगभरातील सर्वच छोट्या आणि मोठ्या हॉस्पिटल्समध्ये मेडिकल फिजिसिस्टची खूप आवश्यकता असते. सहसा कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना नक्की कशा प्रकारे आणि किती रेडिओथेरपी द्यायची याचा सगळं निर्णय हा मेडिकल फिजिसिस्टच्या हातात असतो.

  • मेडिकल फिजिक्स हा भारतामध्ये तीन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असून यामध्ये एक वर्षाची हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप पण असते.

  • संपूर्ण भारताचा विचार केला, तर फक्त २० ते २५ विद्यापीठांतच हा अभ्यासक्रम चालवला जातो यायचे कारण म्हणजे या कोर्ससाठी भारत सरकारच्या ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डकडून मान्यता घ्यावी लागते. आणि अशा मान्यताप्राप्तच कोर्सच्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटल्समध्ये नोकरी मिळते.

  • बीएससी फिजिक्स केल्यानंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई इथे सर्वांत पहिल्यांदा हा अभ्यासक्रम सुरू झाला. देशातील तो सर्वोत्तम गुणवत्तेचा अभ्यासक्रम मानला जातो. यासाठी त्यांची प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

  • देशातील इतर विद्यापीठांत या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी त्या त्या विद्यापीठांची वेगवेगळी प्रवेश परीक्षा असते.

  • फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगात या कोर्सची संख्या मर्यदितच आहे. जगातील अनेक देशात तर हा कोर्सच शिकवला जात नाही याचे मुख्य कारण म्हणजे त्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून हा कोर्स मान्यताप्राप्त करून घ्यावा लागतो.

  • भारतामध्ये हा कोर्स करून जगातील अनेक देशांत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. साधारणपणे युरोप, अमेरिका आणि आफ्रिकन देशात या विध्यार्थ्यांना खूप मागणी आहे.

संपूर्ण जगभरात मार्च २०२० पासून कॅन्सर रुग्णांचे कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे ४५ टक्के एवढे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कॅन्सर रुग्णांना वेळेत उपचार न मिळणे; तसेच अनेक हॉस्पिटल्समध्ये मेडिकल फिजक्सच्या लोकांची कमतरता असणे. याच कमतरतेमुळे लाखो रुग्णांना रेडिओ किंवा इतर प्रकारची कॅन्सर थेरपी घेण्यासाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत आहेत. गेल्या एका वर्षांपासून जगातील अनेक देशातील विद्यापीठांत जवळच्या कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने हा कोर्स सुरू केला जात आहे. भारतातील भविष्यतील कॅन्सर रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन आणि या कुशल तंत्रज्ञांची गरज ओळखून भारतातही या कोर्सची संख्या वाढणे गरजेचे आहे. तसेच फिजिक्ससारख्या मूलभूत विषयात पदवी घेऊन भविष्यातील मेडिकल क्षेत्रात करियर करण्याची संधीपण विद्यार्थ्यांना मिळवून देणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com